मुंबई : सोमवारी सकाळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं होतं की, पुढच्या एक ते दोन दिवसांमध्ये आपली राजकीय वाटचाल कशी असेल याविषयी निर्णय घेईन. परंतु ते आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितले आहे.
काही वेळातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आदर्श घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप पुन्हा एकदा लावले जात आहेत. या आरोपांसह ते त्यांच्यासोबत किती आमदार घेऊन काँग्रेस मधून फुटणार या चर्चेला देखील उधान आले असताना त्यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं की, मी आज काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराला माझ्यासोबत येण्यासाठी निमंत्रण दिलेलं नाही.