नवी दिल्ली : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रूपाली गांगुली Actress Rupali Ganguly हिने आज भाजपचे BJP राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे Vinod Tawade यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज नवी दिल्लीमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
काही दिवसांपूर्वीच रूपाली हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली होती. यावेळी रूपाली म्हणाली की, ” देशात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या विकासाचा हा महायज्ञ पाहिल्यानंतर मला देखील यात सहभागी व्हावे वाटले. मला तुमच्या आशीर्वादाची आणि पाठिंब्याची गरज आहे. जेणेकरून मी जे काही काम करेल ते चांगले काम करेल. ” असे रूपालीने माध्यमांशी संवाद साधताना बोल म्हटले आहे.
रूपाली गांगुली या अभिनेत्रीने अनुपमा या मालिकेमध्ये केलेलं काम चहात्यांनी खूप पसंत केले. तिला आता अनुपमा या नावाने देखील ओळखले जाते. त्याचबरोबर या अभिनेत्रीने विनोदी मालिका साराभाई वर्सेस साराभाई यामध्ये देखील मोनिषाची व्यक्तिरेखा केली होती. ती देखील चाहत्यांनी खूप पसंत केली आहे. या व्यतिरिक्त तिने काही चित्रपट आणि मालिकांमध्ये देखील काम केल आहे.
आईने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूपाली गांगुली हिने भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे ती आता लोकसभा निवडणूक लढवणार का ? असा सवाल अनेकांच्या मनामध्ये उपस्थित होतो आहे. परंतु यावर मात्र रूपाली किंवा भाजपच्या वतीने कोणताही अधिकृत वक्तव्य केलं गेलेलं नाही.









