नोएडा : व्हिसाशिवाय भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करणारी पाकिस्तानी महिला सीमा हैदर (Seema Haider) आणि तिचा प्रियकर सचिन सिंग (Sachin Singh) यांना सोमवारी अटक करण्यात आलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय सीमा हैदरवर बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलांय. त्याचवेळी सचिन आणि त्याचे वडील नेत्रपाल यांच्यावर 120B आणि कलम 34 अंतर्गत कारवाई करण्यात आलीये. दोघही पब्जी खेळताना एकमेकांच्या प्रेमात पडले (Seema Haider Love Story) आणि आता त्यांना लग्नगाठ बांधायचीये. ती गुप्तहेर तर नाही ना ? ह्याचा देखील तपास सुरूये.
सीमा कराचीहून दुबईमार्गे नेपाळला पोहोचली
मिळालेल्या माहितीनुसार सीमा हैदर तिच्या चार मुलांसह मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कराचीहून दुबईमार्गे नेपाळला पोहोचली. सचिनने पाकिस्तानी ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून दुबईमार्गे सीमेवरून नेपाळला जाण्यासाठी फ्लाइट बुक केली. सीमाने 10 मे रोजी पाकिस्तान सोडले आणि 11 मे रोजी नेपाळला पोहोचले. येथून त्यांनी काठमांडूहून पोखरा अशी बस पकडली. मग पोखराहून दिल्लीला बस पकडली. 13 मे रोजी सीमा ग्रेटर नोएडातील रबुपुराजवळ यमुना एक्सप्रेसवेवर पोहोचली. सचिनने पाकिस्तानी महिलेला बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्यास मदत केली आणि तिला आपल्या घरात ठेवले. सोमवारी दोघांना बल्लभगड येथील बसमधून अटक करण्यात आली.
PUBG खेळताना पहिल्यांदा संपर्कात आले होते
डीसीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि सीमा हैदर 2020 मध्ये ऑनलाइन गेम PUBG खेळताना पहिल्यांदा संपर्कात आले. यानंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले, मात्र त्यानंतर मेसेज आणि व्हिडिओ कॉलची प्रक्रिया सुरू झाली. या वर्षी मार्चमध्ये दोघही नेपाळमध्ये भेटले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच सीमाने भारतात बेकायदेशीरपणे येण्याचा कट रचला. यानंतर त्यांनी यूट्यूबवर भारतात येण्याचे सोपे मार्ग शोधले. चौकशी दरम्यान तिच्याकडे तिच्या पहिल्या लग्नाची सीडी सापडलीये. ती कंम्प्यूटरमध्येही मास्टर आहे. ती गुप्तहेर तर नाही ना ? ह्याचा देखील तपास सुरूये.
सरकारला मागितली लग्न करण्याची परवानगी
पोलिस कोठडीत जाण्यापूर्वी सीमा हैदर आणि सचिन यांनी ग्रेटर नोएडा येथील डीसीपी कार्यालयात पोलीस आणि सरकारला लग्नाची परवानगी देण्याची विनंती केली. सचिन म्हणाला, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की, मला सीमासोबत लग्न करण्याची परवानगी द्यावी. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मला सीमा आवडते. ती पाकिस्तानी आहे म्हणून पोलिसांनी अटक केलीये. तर सीमा हैदर म्हणाली की, तिने काहीही चुकीचे केले नाही म्हणून कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे. ती पुढे म्हणाली, मी इथे मरायला तयार आहे. मी पाकिस्तानात परत जाणार नाही. तिथे माझं कोणी नाही. सीमाने सांगितले की, माझ्या पतीने मला वर्षभरापूर्वी घटस्फोट दिलांय. माझं सचिनवर प्रेम आहे आणि मला त्याच्याशीच लग्न करायच आहे.