आयोध्या : आज अयोध्या Ayodhya श्रीराम ShriRam मंदिरामध्ये गर्भगृहात प्रभू श्रीराम विराजमान झाले आहेत. ठरलेल्या मुहूर्तावर प्रभू श्रीराम प्रतिष्ठान संपन्न झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही महापूजा संपन्न झाली आहे.
आजच्या या सोहळ्यासाठी देशभरातुन नेते ,अभिनेते, आणि सर्वसामान्य देखील उपस्थित आहेत ठरलेल्या वेळेप्रमाणे आज प्रभू श्रीरामांची विधिवत पूजा करून मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाला आहे. मन भक्ती भावाने प्रसिद्ध होईल असे मंत्रोच्चार मंदिरामध्ये सुरू आहेत.
आज याची देही याची डोळाजे हा सोहळा पहात आहे. त्यांच्यासाठी प्रभू श्रीरामांचा हा आशीर्वादच म्हणावा लागेल. पुन्हा हा सोहळा होणार नाही. पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामांचा खऱ्या अर्थाने वनवास संपला आहे. आणि प्रचंड भक्तीभावाने, विधिवत मंत्रोच्चारामध्ये प्रभू श्रीरामाचे स्वागत अयोध्या मध्ये करण्यात आल आहे.