महाराष्ट्र : गेल्या वर्षी पावसानं चांगलीच दडी मारली होती. सुरुवातीला झालेला तुफान पाऊस पण त्यानंतर पावसानं दिलेल्या ओढीने परिणामी आता धरण अक्षरशः आटली आहेत. ही परिस्थिती आहे छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर मधील ढेकु या धरणातील…
महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये खरंतर दरवर्षीच पाणी टंचाईने लोक अक्षरशः हतबल होऊन जातात यावर्षी पुन्हा एकदा प्रचंड दुष्काळाला महाराष्ट्र सामोरा जातो आहे. मुंबईत देखील पाणी वापरावर निर्बंध आणण्यात आले आहेत. तर जळगावमध्ये तापमान 47 अंश डिग्री सेल्सिअसवर पोहोचल्याने जनावर देखील गतप्राण होत आहेत. वैजापूर मधील ढेकू हे धरण आटल्याने धरणातील माशांनी अक्षरशः तडफडून प्राण गमावले आहेत. एकंदरीत परिस्थिती पाहता या उन्हाळ्यात माणसासह इतर जीवांची देखील निसर्गाने अंपरीक्षा पाहिली आहे.
मराठवाड्यामध्ये महिलांना हंडाभर पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागते आहे. अनेक धरण असून देखील सुनियोजित कारभार नसल्यामुळे दरवर्षी पाण्यासाठी नागरिकांना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. परंतु यावर्षीच भीषण वास्तव पाहता आता तरी सामान्य माणसांपासून ते राजकारणी यांनी जाग होण फार आवश्यक असल्याचा चित्र आहे.
जळगावात उष्णतेची लाट : तापमानाचा पारा 47 अंश सेल्सिअसवर; 100 हून अधिक मेंढ्यांचा उष्माघाताने मृत्यू