नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याला उष्णतेच्या चटक्याने हैराण करून सोडले होते. आता मान्सूनने Rain Update महाराष्ट्रात प्रवेश केला असून पावसाच्या पाण्याने देखील नागरिक आता धास्तावले आहेत. नाशिकमध्ये पावसाने अक्षरशः कहर केला असून यामध्ये दोघा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते आहे.
रविवारी नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. एकीकडे पेरण्या सुरू असल्यामुळे बळीराजा सुखावला असला तरीही वादळी वाऱ्यामुळे 25 कांदा शेड उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक झाडे कोसळली आहेत. तर अनेक ठिकाणी पत्रे देखील उडाले आहेत. यामुळे नागरिकांची प्रचंड धांदल उडाली आहे.
Jalana : जालन्यात धक्कादायक प्रकार : जिल्हा परिषद कार्यालयासमोर भ्रष्टाचाराचा आरोप करून 3 युवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न
नाशिकच्या चांदवड शहरातून देखील एक मोठी बातमी समोर येते आहे. चांदवड शहरातील सोमवार पेठ भागामध्ये झालेल्या प्रचंड पावसाने रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते. या पावसाच्या पाण्याचा लोट एवढा होता की यामध्ये एक कार देखील पलटली आहे. तर मनमाड शहरातून वाहणाऱ्या रामगुळना आणि पांझण नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे.