आला आला उन्हाळा, तब्येती सांभाळा ! राज्यात आता उन्हाळ्याचा कडाका चांगलाच वाढला आहे. तापमानामुळे अनेक आजारांना आणि व्याधींना आमंत्रण मिळते. उन्हाळ्यात विशेष करून शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे काही महत्त्वाच्या टिप्स नक्की फॉलो करा त्यामुळे उष्माघातापासून तुमचा बचाव होऊ शकतो.
- तहान लागली नसली तरीही पुरेसे पाणी आणि शक्य तितक्या वेळा पाणी प्या. शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे खूप गरजेचे आहे.
- हलके, फिकट रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला. गडद रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात.
- उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री/टोपी, शूज किंवा चप्पल वापरा.
- मद्य, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळा, जे शरीराला शुष्क करतात.
- उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
- पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका
- लिंबू पाणी, ताक, पन्हे इत्यादी घरगुती पेये वापरा जे शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यास मदत करतात. उन्हातून आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. जरा वेळ शांत बसून हलके थंड पाणी बसून हळू हळू प्यावे .
- जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी प्यायला द्या.
- तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा. ऐअर कण्डिशनरचा वापर करत असाल तर टेम्परेचर अति थंड ठेऊ नका.
- पंखे, ओले कपडे वापरा आणि वारंवार थंड पाण्याने आंघोळ करा. डर्मी कुल सारख्या थंडावा देणाऱ्या पावडर चा वापर करावा.
- उन्हाळ्यात आवश्यक नसेन तर दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे.
- उष्माघाताने कोणाला त्रास होऊ लगलाच तर तातडीने काखेत, मांड्यांवर, कपाळावर थंड पाण्याच्या पाट्या ठेवा.
- घोळणा फुटाणे ( नाकातून रक्त येणे ) हा उन्हाळ्यात होणार सामान्य त्रास आहे. अशा वेळी डोक्यावर मागे झोपवून कपाळावर आणि डोक्यावर पाणी टाकावे.