Musty Smell from Clothes During Monsoon : उन्हाळ्याच्या ऋतूनंतर आपण सर्वजण पावसाळ्याची वाट पाहतो. पावसाळा सुरू होताच खूप आल्हाददायक वाटते, पण काही दिवस उलटून गेले की, सतत पडणाऱ्या पावसामुळे जगभरातील समस्या एकामागून एक समोर येतात. यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे कपडे सुकवणे. ब-याच वेळा पाऊस थांबला आहे, असा विचार करून आपण कपडे सुकवतो आणि मग कपडे पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरही पुन्हा पाऊस सुरू होतो. आपण कितीही प्रयत्न केले तरी या ऋतूत कपड्यांना सूर्यप्रकाश मिळणे कठीण होऊन बसते. त्यामुळे कपड्यांमध्ये ओलावा टिकून राहतो. त्यामुळे कपड्यांमध्ये बॅक्टेरिया आणि फंगस वाढू लागतात, ज्यामुळे ओल्या कपड्यांमध्ये दुर्गंधी येते. ओल्या कपड्यांचा वास दूर करण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा –
- पावसाळ्यात शक्य असल्यास तुमचे कपडे गरम किंवा कोमट पाण्याने धुवा. – धुतलेले कपडे नीट पिळून घ्या किंवा वॉशिंग मशीनच्या (Washing Machine) मदतीने ते वाळवा.
- कपडे धुतल्यानंतर तुम्ही त्यांना एकदा कापूरच्या पाण्यात धुवूनही टाकू शकता, त्यानंतर ते पूर्णपणे वाळवा. यामुळे कपड्यांच्या दुर्गंधीपासून आराम मिळेल.
- पावसाळ्याच्या दिवसात पंख्याखाली कपडे सुकवणे हा देखील एक उत्तम पर्याय आहे. असे केल्यानेही कपड्यांना वास येणार नाही.
- कपाटात कपडे ठेवताना, ते वर्तमानपत्रात देखील गुंडाळले जाऊ शकतात, ते ओलावा शोषण्यासाठी चांगले आहे.
- कपडे धुताना पाण्यात थोडासा बेकिंग सोडा टाका, यामुळे कपड्यांमधून येणारा वासही निघून जाईल.
- कपडे प्लॅस्टिक पेपरमध्ये दुमडून कपाटात ठेवल्यास ते कपाटाशी थेट संपर्कात येणार नाहीत आणि खराब होणार नाहीत.
- पावसाळ्यात कपड्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही आणि जर तुम्ही अनेकदा तुमचे अर्धे कोरडे कपडे काढून पुन्हा तसेच ठेवता, तर तसे न करता ते कपडे पंख्याखाली ठेवा.
- कपडे धुतल्यानंतर, ते सुकविण्यासाठी अशी जागा निवडा, जिथे भरपूर हवा असेल. यामुळे कपड्यांना दुर्गंधी येणार नाही.
- कपाटात नेहमी कापूरच्या काही गोळ्या ठेवा. हे कपड्यांना दुर्गंधी आणि कीटकांपासून वाचवण्याचे काम करते.
- पावसाळ्यात कपडे धुताना लिंबाचा रस वापरला तर तुमच्या कपड्यांना वास येणार नाही. ज्या पाण्याने तुम्ही कपडे धुणार आहात त्यात लिंबाचा रस मिसळा. असे केल्यास कपड्यांना घाण वास येणार नाही. ओल्या कपड्यांतील ओलाव्यामुळे त्यांना वास येऊ लागला तर एका बादलीत लिंबाचा रस मिसळा आणि त्यात काही वेळ कपडे बुडवून ठेवा. लिंबूमध्ये असलेले नैसर्गिक ऍसिड दुर्गंधी दूर करण्याचे आणि बॅक्टेरिया नष्ट करण्याचे काम करते.