उन्हाळ्यात सर्वच जण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. पण तुमच्या आनंदावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून काही गोष्टीची काळजी तुम्ही घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात अनेकदा कारला आग लागण्यासारख्या घटना घडतात. उन्हाळ्यात गाडीला लागलेल्या आगीपासून वाचवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
शॉर्ट सर्किट
कोणत्याही कारला आग लागण्याचा सर्वाधिक धोका शॉर्टसर्किटमुळे असतो. जेव्हा उन्हाळ्यात एकापेक्षा जास्त तारांचा बाह्य संरक्षण पृष्ठभाग वितळतो आणि चिकटतो तेव्हा शॉर्ट सर्किट होते. त्यामुळे उन्हाळ्यात गाडीची सर्व्हिसिंग करून घ्या. सर्व्हिस घेताना कारची तपासणी केली जाते, ज्यामुळे हा धोका कमी होऊ शकतो.
इंजिन जास्त गरम होणे
कारमधील इंजिनचे तापमान खूप जास्त असेल तर अतिउष्णतेमुळे आग लागण्याचा धोकाही वाढतो. उन्हाळ्यात लांबच्या प्रवासात सतत कार चालवल्यामुळे इंजिनचे तापमान अनेक पटीने वाढते. त्यामुळे आग लागण्याचा धोका वाढतो. अशावेळी काही किलोमीटर गाडी चालवल्यानंतर काही वेळ गाडी थांबवावी. तसेच कुलंटचे प्रमाण तपासावे.
परफ्यूम आणि स्प्रे ठेवू नका
गाडीला आगीच्या धोक्यापासून वाचवायचे असेल तर कारमध्ये परफ्यूम किंवा इतर प्रकारचे स्प्रे कधीही ठेवू नयेत. अशा वस्तूंना खूप लवकर आग लागते. त्याचबरोबर त्यांना अत्यंत ज्वलनशील असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. अशा वस्तू गाडीत ठेवल्यास उष्णतेमुळे त्याचा स्फोट होऊन आगीसारखे अपघात होऊ शकतात.
- उन्हाळ्यात जमेल तितक्या सावलीत गाडी लावावी.
- गाडीमध्ये पेट्रोल फुल्ल भरू नका.
- गाडीतील फायर एस्टीन्ग्यूशर तपासून घ्या.
- जमल्यास दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान बाहेर पडणे टाळा.