Lifestyle : कोणाला वाटत नाही की आपण चांगलं दिसावं ? विशेष करून उतारवयाकडे जाताना आपण स्वतःची अधिक काळजी घ्यायला सुरुवात करतो. तसेच चेहऱ्यावर ते दिसायलाही लागतं. पण केवळ या दहा सवयी जर तुम्ही बदलल्या तर तुम्हाला त्याचा नक्की परिणाम दिसून येईल. मग वयाची तिशी पार करायची वाट पाहू नका. आजच या सवयी लावून घ्या
- तहान लागेल तेव्हाच पाणी प्या.
- शाबुदाणा,शेंगदाणे,वरी,दही हे सगळे पित्त वाढवणारे पदार्थ खाऊन उपवास करू नयेत… खरा उपवास म्हणजे लंघन..पोटाला विश्रांती देणे..
- जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात..दुपारी १२ पर्यंत आणि रात्री ८ पर्यंत जेवण करावे.
- दोन्ही जेवणानंतर शतपावली ( १०० पावलच अपेक्षित आहेत )घालावी. म्हणजे अन्न पुढे सरकण्यास आणि पचनाला मदत होते.

5) लोणचे,पापड,अति तिखट,तेलकट, खारट अन्न पदार्थ खाऊ नयेत.
6)रात्री च्या वेळी दही खाऊ नये.

7)रोज ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा.
8)मधल्या भुकेच्या वेळेत त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारे फळ,राजगिरा लाडू,साळीच्या लाह्या,खजूर हे खावे…फरसाण,बिस्कीट,शेव हे सर्व पित्त वाढवणारे पदार्थ आहेत.
9) आपण जिथे राहतो तिथे ज्या स्थानिक भाज्या पिकतात,फळे मिळतात ते खावे..फळे नुसतीच खावीत, दुधात घालून,दह्यात मिक्स करून खाऊ नयेत…फळांची मूळ चव आणि गुणधर्म बदलतात अशाने..
10) जेवणात २ चमचे तुपाचा समावेश जरूर असावा. तुपाने कोलेस्टेरॉल वाढत नाही..तूप हे दुधावर अनेक संस्कार केल्यानंतर तयार होते त्यामुळे पचनासाठी चांगले असते..