ऑटिझम : लहान मुलांमधील ऑटिझम Autism यामुळे आज लाखो मुलं त्रस्त आहेत. अनेक वेळा पालकांना ऑटिझमची लक्षणे माहीत नसल्याने मुलांमधील हा आजार दुर्लक्षित होतो. परंतु ऑटिझम असेल तर तो लवकरात लवकर ओळखून उपचार घेणे मुलांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे.
ऑटिझम असलेल्या मुलांची ही आहेत सामान्य लक्षणे
- साधारणतः मूल 18 महिन्याचे ते 2 वर्षाचे होईपर्यंत तुटक शब्द बोलायला सुरुवात करते. दोन वर्षाचे होऊन गेल्यानंतर जर तुमचे मुल बोलत नसेल तर हे ऑटिझमचे किंवा स्पीचडिले असल्याचे लक्षण आहे.
- आवाज दिल्यानंतर जर मूल तुमच्याकडे पहात नसेल किंवा कोणताही रिस्पॉन्स देत नसेल तर हे ऑटिझमचे लक्षण आहे.
- मोठ्याने आवाज झाल्यास किंवा कोणी मोठ्याने बोलल्यास कानावर हात ठेवणे हे देखील ऑटिझमचे लक्षण आहे.
- अति पाण्यात खेळणे, एखाद्या वस्तूशी-खेळाशी जास्त वेळ खेळत राहणे म्हणजे ऑटिझमचे लक्षण असू शकते.
- जवळपास असणाऱ्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्या जवळ न जाता एकटे बसून राहणे हे सर्वात मोठे ऑटिझमचे लक्षण आहे.
- जर तुमच्या दोन वर्ष पूर्ण झालेल्या मुलांमध्ये तुम्हाला ही सामान्य लक्षणे वाटत असतील तर आजच योग्य वैद्यकीय सल्ला घ्या.
खरं पाहता मुलं उशिरा बोलणं यामध्ये फार गैर नाही. अनेक मुलं उशिरा बोलतात. परंतु ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये स्पीच डिले विशेष करून असतोच. तुम्हाला जर मुलांमध्ये स्पीच डिले आणि वरील काही लक्षणे आढळत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. लहान मुलांच्या पाच ते सहा वर्षापर्यंत योग्य उपचार आणि ट्रेनिंग मिळाले की ही मुलं अगदी सर्वसामान्य होऊ शकतात.
जर ऑटिझम डिटेक्ट झाला तर काय करावे
- योग्य वैद्यकीय सल्ल्यानंतर जर मुलाला ऑटिझम आहे हे निष्कर्ष डॉक्टरांनी सांगितले तर डॉक्टरांनी दिलेली औषधे आणि नियम काटेकोरपणे पाळावेत.
- औषधांच्या योग्य वेळा, यासह मुलाशी अधिक बोलणे त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाणे सोशल ऍक्टिव्हिटी वाढवणे आजच सुरू करा.
- जर बाळ तुमच्या आवाजाला रिस्पॉन्स देत नसेल आणि तुमच्या नजरेला नजर देत नसेल तर दिवसभरातून एक तास त्यांच्याशी खेळणे. गरज पडल्यास त्यांना मांडीवर घेऊन त्यांना तुमच्याकडे पाहायला लावून गप्पा मारणे. वेगवेगळे आकार रंगाचे खेळ खेळणे हे उपचार सुरू करा.
- मुलांमध्ये पाठवण्यासाठी शाळा सुरू करा. बोलता येत नाही किंवा समजत नाही म्हणून कोणतीही शाळा त्यांना घेण्यास नकार देत नाही. ऑटिझम हे आजकाल सामान्य आजारापैकी असून होईल तेवढे लवकर मुलांना शाळेत घाला त्यामुळे त्यांची सोशल ऍक्टिव्हिटी वाढेल.
- घरामध्ये तुम्ही जे काम करत असाल किंवा मोठ्यांमध्ये जी चर्चा सुरू असेल त्यामध्ये त्यांना देखील सहभागी करून घ्या. मुलांना समजत नाही असे तुम्ही समजू नका. कारण वाचा फुटल्यानंतर तुम्ही जे त्यांना आता बोलून शिकवत आहात किंवा कृतीतून शिकवत आहात ते जसेच्या तसे करणार आहेत. त्यामुळे अशा मुलांसमोर जपून वागा आणि बोला.