बाजारात लवकरच टाटा समुहाच्या कंपनीचा आयपीओ दाखल होणार आहे. तुम्ही टाटा समूहाचा आयपीओ विकत घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यााठी फायद्याची बातमी आहे. तब्बल दोन दशकानंतर म्हणजे सुमारे 20 वर्षानंतर टाटा समुहाच्या कंपनीचा आयपीओ सुरु होणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ उघडू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
टाटा टेक्नॉलॉजीजच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी टाटा समूह मॉर्गन स्टॅनले इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, ब्लॅकरॉक आणि काही अमेरिकन हेज फंडांशी बोलणी करत असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे. ब्लॅकरॉक आणि मॉर्गन स्टॅनली यांच्यासोबतच टाटा टेक आपल्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अमेरिकन मालमत्ता व्यवस्थापक घिसल्लो कॅपिटल, ओकट्री कॅपिटल आणि की स्क्वेअर कॅपिटल यांच्याही संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ नोव्हेंबरच्या आसपास सबस्क्रिप्शनसाठी उघडू शकतो. म्हणजेच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ उघडू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विदेशी फंड कंपनीमध्ये 2.5 अब्ज डॉलरच्या मुल्यांकनाने गुंतवणूक करू शकतात. गेल्या महिन्यात, TPG ने IPO पूर्व निधी उभारणीत कंपनीतील 9.9 टक्के हिस्सा घेतला. या IPO चा आकार 35 ते 375 दशलक्ष डॉलर्स असू शकतो. दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सवर ग्रे मार्केट तेजीत आहे. ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स 275 रुपयांच्या प्रीमियमवर आहेत. तर, आतापर्यंत प्राइस बँकेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.