बदलत्या काळानुसार क्रेडिट कार्डच्या CREDIT CARD कर्जाचे LOAN ओझे वाढल्यास आपल्या क्रेडिट रेटिंगवर CREDIT RETTING बर्यापैकी परिणाम होऊ शकतो. भविष्यात आपल्याला कर्ज किंवा क्रेडिट मिळण्याची शयता कमी राहते. आपल्या आर्थिक तब्येतीसाठी आपले क्रेडिट कार्डचे बॅलेन्स कमी राखणे गरजेचे आहे. आपण क्रेडिट कार्डने बॅलेन्सचे नियमित पेमेंट करत असाल तर आणि जर क्रेडिट बॅलेन्स एका महिन्यातून दुसर्या महिन्यात ट्रान्सफर करत नसाल तरीही बॅलेन्सवर जो व्याजदर आकारला जातो, तो आपण बर्यापैकी कमी करू शकतो. यातून बर्यापैकी पैसा वाचू शकतो. या ठिकाणी काही पद्धतीचा अवलंब केल्यास क्रेडिट कार्डवर भरण्यात येणार्या व्याजाला काही प्रमाणात कमी करू शकतो.
दर महिन्याला एकापेक्षा अधिक पेमेंट करा : आपल्या क्रेडिट कार्डच्या बॅलेन्सवर आपल्याला दररोजच्या हिशोबाने व्याज आकारले जाते. उदा. आपला व्याजदर तीन टक्के दरमहा असेल आणि आपले क्रेडिट कार्डचे देयक १० हजार असेल आणि त्याचे पेमेंट न केल्यास आपल्याला दरमहा ३०० ते ५०० रुपयांच्या हिशोबाने व्याज आकारले जाईल. साधारणत: आपल्याला दरमहा तीन टक्के हे व्याज कमी वाटू शकते, परंतु त्याचे वार्षिकदृष्ट्या पाहवयाचे झाल्यास ते ३६ ते ६० टयांपर्यंत पोचू शकते. यात शेवटी व्याजदराच्या रुपाने मोठी रक्कम भरावी लागते. याशिवाय बॅलेन्स जेवढा अधिक असेल किंवा खात्यात दिर्घकाळ जेवढी रक्कम राहील, त्या प्रमाणात व्याज भरावे लागेल. यासाठी क्रेडिट कार्डच्या बॅलेन्सचे पेमेंट करण्यासाठी महिनाखेरची वाट पाहू नये. नियमितरुपाने कमी प्रमाणात का होईना काही ना काही रक्कम भरणे हिताचे ठरेल. यातून क्रेडिट कार्डचा बॅलेन्स कमी होत राहिल आणि व्याजाच्या रुपातून बाहेर जाणारा पैसा देखील कमी राहिल.

लवकरात लवकर पूर्ण पेमेंट भरण्याचा विचार करा : बहुतांश क्रेडिट कार्डसाठी दरमहा किमान पाच टक्के पेमेंट करणे गरजेचे असते. उर्वरित शिलक ही पुढच्या बिलात सामील होते आणि त्यावर व्याज आकारले जाते. त्यावर साधारणत: ४ टक्के व्याजदर आकारले जाते.. हा व्याजदर कमी असल्याचे समजू नका. कारण हा व्याजदर कमी असल्याचे गृहित धरल्यास आपल्याला भविष्यात जबर किंमत मोजावी लागेल आणि आपण कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता. त्यामुळे लवकरात लवकर कर्ज फेडण्याचे आणि बॅलेन्स कमी ठेवण्याचा प्रयत्न करा.
व्याजमुक्त खरेदीचा लाभ उचला: ज्या खात्यावर बॅलेन्स राहत नाही, अशा खात्यावर बहुतांश बँका रिवार्ड पॉइंटस देत असतात. याशिवाय व्याजमुक्त कालावधीचा लाभही कार्डधारकांना दिला जातो. हा कालावधी ४५ दिवसांपर्यंतचा असतो. याचाच अर्थ आपल्याला क्रेडिट कार्डने खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल आपण वेळेत भरल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारचे व्याज देण्याची गरज नाही. व्याजमुक्त कालावधीचा फायदा उचलण्यासाठी आपण मोठ्या खरेदीचा लाभ उचलणे गरजेचे आहे. यातून व्याजात मोठी बचत होऊ शकते.एवढेच नाही तर व्याजमुक्तीचा कालावधी संपेपर्यंत आपण काही प्रमाणात पेमेंटही करू शकता. याप्रमाणे आपण त्यावर आकारण्यात येणार्या व्याजात आपण बचत करू शकतो. क्रेडिट कार्ड धारकांनी आणखी एक बाब लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे क्रेडिट कार्डच्या रोख रक्कमेवर व्याजमुक्तीची सवलत नसते. त्यामुळे आपण लवकरात लवकर बिल भरणे हिताचे ठरेल.
कमी व्याजदराच्या कार्डमध्ये बॅलेन्स ट्रान्सफर: क्रेडिट कार्डच्या बॅलेन्सला चालू महिन्यातून दुसर्या महिन्यात कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी आपल्याला ४ टक्के व्याज मोजावे लागेल. जर आपण एका कार्डने बॅलेन्स फेडण्यास असमर्थ असाल आणि आपल्याकडे कमी व्याजदराचे किंवा नो-इंटरेस्ट रेटचे कार्ड असेल तर अगोदर आपण पहिल्या कार्डचे बॅलेन्स दुसर्या कार्डमध्ये ट्रान्सफर करण्याचा विचार करावा. मात्र अशा प्रकारे बॅलेन्स ट्रान्सफर करण्यापूर्वी प्रक्रिया शुल्क आणि अन्य शुल्काचा निश्चित विचार करावा. याशिवाय आपल्याकडे दुसर्या कार्डचे बॅलेन्स पूर्ण फेडण्यासाठी पैसे आहत की नाही, हे देखील लक्षात घ्यावे, अन्यथा भविष्यात त्याची जबर किंमत मोजावी लागेल.
खरेदी हप्त्यात बदला: मोठ्या खरेदीच्या व्यवहारात एकूण रक्कमेवर आकारण्यात येणार्या व्याजाची रक्कम मोठी असू शकते. अशा स्थितीत थेट मर्चंटच्या मदतीने किंवा क्रेडिट कार्डच्या कंपनीत हप्त्याची निवड करावी. या पेमेंटला हप्त्यात बदलून त्यावर आकारण्यात येणार्या व्याजाची रक्कम कमी करू शकता.
खर्चाची विभागणी करा: आपण प्रत्येक महिन्याला क्रेडिट कार्ड बॅलेन्सचे फुल पेमेंट करण्यास असमर्थ असाल तर आपल्या खर्चाला दोन क्रेडिट कार्डमध्ये विभागणी करणे फायदेशीर ठरू शकते. अशा प्रकारची विभागणी करताना सावधगिरी न बाळगल्यास आपल्याला आर्थिक अडचण येऊ शकते. तरीही खर्चाची विभागणी चांगल्या रितीने हँडल केल्यास फायदा होऊ शकतो. यात एका कार्डला लिन क्रेडिट कार्ड गृहित धरू. कारण त्याचे पेमेंट आपण वेळेवर करत असतो. याप्रमाणे आपण दुसर्या कार्डचे बॅलेन्स आपोआपच कमी होत राहिल आणि व्याजही कमी भरावे लागेल. एका कार्डच्या बॅलेन्सचे पेमेंट नियमितपणे आणि शिस्तबद्धरित्या करत असल्याने आपल्या क्रेडिट रेटिंगवरही त्याचा परिणाम कमी राहील.
कमी व्याजाची मागणी: आपण किती शिस्तबद्धरित्या कार्ड बॅलेन्सचे पेमेंट करता, त्या आधारावर आपल्या क्रेडिट रेटिंगमध्ये बदल होत राहतो. यासाठी क्रेडिट रेटिंग चांगले असेल तर आपण कमी व्याजदराची मागणी करू शकतो. आपल्या क्रेडिट कार्ड कंपनीला व्याजदर कमी करण्याबाबत सांगावे किंवा अन्य कंपनीचे कार्ड पाहण्यात गैर नाही. याशिवाय आपण सध्याच्या कार्ड कंपनीला इंटरेस्ट रेट कमी करण्यासाठी आग्रह करू शकता. हा आग्रह वाटाघाटीच्या रुपातूनही करू शकता. ग्राहक टिकवण्यासाठी कंपन्या सतत प्रयत्नशील असतात. या माध्यमातून आपल्याला विद्यमान कंपनी काही प्रमाणात सवलत देऊ शकते.
लक्षात ठेवा: क्रेडिट कार्डच्या कर्जाला मॅनेज करण्यासाठी आपल्याला बॅलेन्सचे नियमित पेमेंट करणे गरजेचे आहे. मोठ्या खरेदीचे नियोजन करावे आणि त्याप्रमाणे त्याची परतफेड करण्याचे वेळापत्रकही आखून घ्यावे. आर्थिक शिस्त असल्यास आपल्याला अकारण भुर्दंड बसणार नाही आणि अशा कृतीतून आपण आरामात पैशात बचत करू शकता. या माध्यमातून आपण क्रेडिट स्कोर चांगल्या रितीने राखू शकता.