Prabodhankar Thackeray : एक विचारवंत लेखक,पत्रकार,धर्मसुधारक,परखड वक्ते,इतिहास संशोधक,समाज सुधारक,संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील प्रमुख नेते,आणि महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांच्या चळवळीतील अग्रणी अशी अनेक विशेषण ज्या नावाला दिली जातात ते नाव म्हणजे केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे Prabodhankar Thackeray Memorial Day खरतर हे नाव माहिती नसेल असं एकही मराठी घर अख्ख्या महाराष्ट्रात नसेल.महात्मा फुलेंना आदर्श मानणाऱ्या प्रबोधनकारांनी सामाजिक अन्यायाविरुद्ध नेहमीच आवाज उठवला होता.पुण्यातील कट्टर सनातन्यांनी महात्मा फुलेंचा पुण्यात छळ केल्यानंतर फुलेंचा वैचारिक लढा पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रबोधनकार स्वतःपुण्यात येऊन राहिले होते.खर म्हणजे प्रबोधनकारांचे नाव हे केवळ महात्मा फुले या नावाशी जोडले जाते असे नाही तर महात्मा गांधीशी सुध्दा हे नाव जोडले जाते कारण याच प्रबोधनकारांनी महात्मा गांधीचा एकदा प्राण वाचवला होता.परंतु तो प्रसंग नेमका कधी आणि कुठे घडला होता याबद्दलचा किस्सा जाणून घेणार आहोत.
तर प्रबोधनकार ठाकरे यांनी महात्मा गांधीचां जीव वाचवला होता तो प्रसंग आहे साल १९३८ मधला सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतलेल्या गांधीजीनी त्यावेळी अस्पृश्यता निर्मूलन करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता व त्यासाठी देशभरात त्याचे दौरे सुरु होते.आणि असाचा एक दौरा त्यांनी महाराष्ट्रातील अकोल जिल्ह्यात एके दिवशी नियोजित केला होता.आणि योगायोगाने नेमक्या त्याच दिवशी प्रबोधनकार ठाकरे सुध्दा ‘वॉर्डन इन्शुअरन्स’ या विमा कंपनीचे एजन्सी सुपरिटेंडेंट म्हणून काही कामानिमित्त अकोला येथे गेले होते.व त्यांच्या एका मित्राने तेथे नुकताच छापखाना सुरु केला होता ते पाहण्यासाठी प्रबोधनकार तिथे गेले होते.व तिथे गेल्यावर त्या मित्राशी गप्पा मारताना प्रबोधनकारांना असे समजले की आज सायंकाळी महात्मा गांधी या ठिकाणी येणार आहेत व उद्या त्यांची सकाळी आठ वाजता सभा होणारा आहे त्यामुळे गांधींचा निषेध करण्यासाठी येथील काही तरुणांनी छापखान्यात काळी झेंडे तसेच जाडजुड काठ्या आणून ठेवल्या आहेत.हा प्रकार समजताच प्रबोधनकारांना या बद्दल शंका आली.आणि त्यांनी लगेच आपल्या मित्राला या काठ्यांचा बंदोबस्त करायला सांगितले आणि छापखाना बंद करून मित्राला घरी पाठवले आणि पुढची सगळी सूत्रे स्वतच्या हातात घेतली.प्रबोधनकारांनी तेथील काही पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली व गांधीजी ज्या मार्गाने येणार आहेत त्याची पाहणी केली तसेच गांधीसाठी नेकमा बंदोबस्त कसा आहे याचे नियोजन समजून घेतले.
प्रबोधनकारांनी ‘माझी जीवनगाथा’ या त्यांच्या आत्मवृत्तात दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी अकोल्यात गांधींच्या येण्याच्या मार्गावर टोकदार खिळे पसरवून त्यांची मोटारगाडी पंक्चर करण्याचा तसेच गांधींच्या गाडीवर झाडाची फांदी पाडण्याचाही प्रयत्न झाला होता.परंतु गांधीजी निवासाच्या ठिकाणी सुखरूप पोहचले.दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या भाटीया मैदानावर गांधीजी सभा घेणार होते तेथून हे ठिकाण अगदी जवळ होते.खरतर गांधींनी हरिजन उद्धाराचा प्रश्न हाती घेतला आहे. म्हणून काही ऑर्थोडॉक्स लोकांचा एव्हढा संताप झाला आहे अशी प्रतिक्रिया एका इन्स्पेक्टरने प्रबोधनकारांना दिली.तर दुसऱ्या दिवशी सभास्थानी गर्दी जमायाला सुरूवात झाली होती. गांधीजींना पाहण्यासाठी आसपासच्या खेड्यातून लाखो लोक आले होते व गांधीजींची वाट पाहत बसले होते.परंतु प्रबोधनकार ठाकरे थेट गांधी जिथे मुकामी थांबले होते तिथे पोहचले आणि पाहतात तर काय? गांधी ज्या घरात थांबले होते त्या अंगणात ४०–५० तरुण उघड्या अंगाने जोर जोरात घोषणा देत होते जायचे असेल तर आमच्या छातीवरून जा. त्यामुळे गांधीजींना बाहेर पडून सभा स्थानी जायला रस्ताच नव्हता तर बाहेर रस्त्यावर पोलीस हा सगळा तमाशा बघत उभे राहिले होते.
प्रबोधनकारांनी त्या सगळ्यांना विनवणी केली रस्ता सोडा गांधीजींना जाऊद्या परंतु त्यांनी आपल्या घोषणा सुरूच ठेवल्या.खरतर गांधींना काही करून सभेच्या ठिकाणी घेऊन जावेच लागणार होते. त्यामुळे ठाकरेनी पोलीसांशी चर्चा केली आणि पोलिसांना विचारले की मी सांगतो तसे कराल काय? कारण आता हा पाप-पुण्याचा प्रश्न नाहीये.आणि ठाकरे बेधडक त्याच्या छातीवरून बूट आपटत चालत निघाले.आणि पाठोपाठ पोलिसांनी ही सुध्दा तेच केले व प्रबोधनकार गांधींपर्यंत पोहोचले. आणि त्यांना बघताच गांधीजी हसत हसत म्हणले या ठाकरे पण तुम्ही इथे कसे त्यावर प्रबोधनकार म्हणाले मी तुम्हाला प्रणाम करायला आलो आहे . तुम्हाला सभास्थळी जायचे आहे ना चला यावर गांधीजीनी त्यांना विचारलं पण जायचं कसं अंगणात तर सत्याग्रही झोपले आहेत यावर प्रबोधनकार म्हणाले, सत्याग्रही लोकांच्या छातीवरून आम्ही आलो त्याप्रमणे तुम्ही सुध्दा या परंतु गांधीजी मात्र सत्याग्रहीच्या छातीवर पाय द्यायचं पाप करायला तयार नव्हते. अखेर प्रबोधनकार ठाकरेंनी तोडगा काढला त्यांनी पोलिसांबरोबर आसपासच्या जागेची पाहणी केली.आणि गांधीजींच्या ज्या घरात राहत होते त्या घरच्या मागे एक गल्ली होती.
जिथे जास्त रहदारी नव्हती तेथून सभास्थानापर्यंत जाणे शक्य होईल असे त्यांच्या लक्षात आले. व घराच्या गल्लीच्या बाजूला एका इमारतीची गॅलरी होती आणि गॅलरीला लागून खाली कुसाची बुटकी भिंत होती.ठाकरेनी दोन कार्यकर्त्यांना त्या गल्लीत उभे केले आणि दुसऱ्या दोघांना भिंतीवर उभे केले आणि गल्लीतल्या रस्त्यावर काही पोलिसांना देखील उभे केले व पोलिसांच्या साहाय्याने गांधींना गॅलरीतून कुसावरच्या दोघांनी खाली घेतले व तेथून खालच्या दोघांनी गांधींना अलगद खाली उतरवले.आणि सगळे जण चालत चालत झपाट्याने सभेच्या ठिकाणी रवाना झाले. आणि पुढील दोन-तीन मिनिटांतच ‘महात्मा गांधी की जय’ अशा घोषणा मैदानावर होऊ लागल्या आणि या घोषणा कानी पडताच अंगणातले सत्याग्रही उठून बाहेर पडू लागले.परंतु पोलिसांनी त्यांना अडवून धरले आणि मग गांधींची सभा सुरळीत व सुखरूप पार पडली.परंतु सभा संपल्यानंतर हा सर्व प्रकार शहरवासीयांना कळल्यावर संतापाची लाट उसळली.गांधीविरोधकांची छीः थू होऊ लागली.लोक त्यांच्या घरासमोर जमून त्यांना शिवीगाळी करीत धमक्या देऊ लागले. सार्वजनिक संतापाचे ते विराट स्वरूप पाहून काही व्यापा-यांनी,काही स्थानिक ब्राह्मणेतर पुढारी आणि पोलीस यांच्या मध्यस्थीने कॉटन मार्केटच्या आवारात त्याच दिवशी ठाकरे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले.ठाकरे यांनीही घडलेल्या घटनांचा पाढा स्पष्ट बोलून विरोधकांच्या या हीन वृत्तीचा ठाकरी शैलीत खरपूस समाचार घेतला.त्यानंतर दोन-तीन मारवाडी व्यापा-यांनीही पश्चात्ताप व्यक्त केला आणि महात्मा गांधींची जाहीर माफी मागितली.त्यामुळे जनतेचा क्षोभ शांत झाला.खरतर प्रबोधनकार ठाकरे कधीच गांधीवादी नव्हते, आणि काँग्रेसनिष्ठही नव्हते परंतु तरी देखील त्यांना महात्मा गांधीचां आदर होता. त्यांनी जीवनभर पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेत महाराष्ट्राचे ‘प्रबोधन’ केले.
पुढे २० नोव्हेंबर १९७३ रोजी मुंबईत प्रबोधनकारांचं निधन झालं आणि एक ज्वलंतशिल लेखणीला पुर्णविराम मिळाला त्यावेळी त्यांची जी अंत्ययात्रा निघाली होती ती बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्ययात्रेनंतरची मुंबईतली सर्वात मोठी अंत्ययात्रा मानली गेली आज २० नोव्हेंबर प्रबोधनकारांचं ५० स्मुर्तिदिवस आहे त्यानिमित्त त्यांच्या स्मृत्तीना विनम्र अभिवादन…