इस्रोच्या चांद्रयान- 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग करत भारताने एक नवा इतिहास रचला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोच्या चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे. यामुळे भारत देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे.
हे यश साजरं करण्यासाठी आणि या ऐतिहासिक कामगिरीची आठवण म्हणून केंद्र सरकारने दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ साजरा करण्यात येणारं असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केले होते. आता केंद्र सरकारकडून यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यामूळे यापुढे आता 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.