रस्ते अपघात कमी व्हावेत म्हणून बेशिस्त वाहनचालकांचा दंड वाढविण्यात आला. मात्र, अद्याप अपघात व अपघाती मृत्यू कमी झालेले नाहीत. दररोज बेशिस्त वाहनांना वाहतूक पोलिसांकडून ऑनलाइन दंड केला जातो. पण, वेळेत दंड न भरल्यास पुन्हा तोच नियम मोडल्यास आपोआप दुप्पट ते दहापट दंड होतो ही वस्तुस्थिती आहे.
रुग्ण घेऊन जाताना किंवा रुग्णाला आणायला जाणाऱ्या रुग्णवाहिकेला वाट देणे सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे. रुग्णवाहिका जात असताना वाट न देणाऱ्या वाहनचालकाला 10 हजारांचा दंड होवू शकतो. दरवर्षी राज्यातील सरासरी 98 लाख बेशिस्त वाहनांवर जवळपास बाराशे कोटींपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाते.