मुंबई : गेल्या काही काळामध्ये तरुण आणि अगदी दहा वर्षाच्या मुलाचा देखील हृदयविकाराच्या Heart Atatck झटक्याने मृत्यू Death ओढावला आहे. पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ Video Viral समोर आल्यानंतर आता सर्वांनीच आपल्या हृदयाची काळजी घेणे किती आवश्यक आहे हे समजत आहे.
एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की काही तरुण क्रिकेट खेळत आहेत. सर्व काही खेळीमेळीच्या वातावरणात सुरू असताना बॅटिंग करणाऱ्या तरुणाला अगदी क्षणार्धात चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला असं या व्हिडिओमध्ये दिसून येते आहे.
हा व्हिडिओ नेमका कुठला हे मात्र समजू शकलं नाही. या व्हिडिओमधील ज्या गुलाबी रंगाचा शर्ट घातलेल्या टीममधील बॅट्समनचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला यावरून पुन्हा एकदा ही गोष्ट मात्र प्रकर्षाने लक्षात येते की हृदयविकारावर येणारा ताण हा आजकाल युवकांना देखील शिकार करत आहे.
हृदयविकार होऊच नयेत हे खरंतर म्हणणं चुकीचं आहे. परंतु आपल्या शरीराची आपणच काळजी घेणं मात्र आपल्या हातात आहे. त्यामुळे योग्य वेळेत पौष्टिक अन्न मद्यपानासारखा व्यसन न करणं, झोपेच्या ठराविक आणि पुरेशा वेळा पाळणे, ताण तणावातील आयुष्यातून स्वतःसाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी वेळ काढणे हे काही असे उपाय आहेत ज्यामुळे आयुष्यात तुमच्या मनावरचा ताण आणि शरीरावरचा भार कमी करेल.