Stress Management : सध्या धावपळीच्या जगात आपल्या सगळ्यांनाच कोणत्या न कोणत्या गोष्टींचं स्ट्रेस असतो. काही लोकं इतकी हळवी स्वभावाची असतात की प्रत्येक छोटी गोष्ट मनाला लावून घेतात. त्यामुळे ते तणावात अधिक असतात. तणाव आल्याने भावनांना आवर घालता येत नाही. मग छोट्या-छोट्या गोष्टी ही दु:ख देऊन जातात. माणूस नकारात्मक होत जातो. जे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही, अशा परिस्थितीत तुम्ही काही टिप्स फॉलो करु शकतात. ज्याद्वारे तुमचा तणाव सहजपणे नियंत्रित केला जाऊ शकतो. पण अनेकदा या स्ट्रेसचे व्यवस्थापन कसं करायचं हे माहित नसतं. आज आम्ही तुम्हाला स्ट्रेसचं व्यवस्थापनाबाबतीत काही टिप्स जाणून घेणार आहोत. (Stress Management)
तणाव आणि चिंता यापासून राहा लांब
तणाव आणि चिंता यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही जर्नलिंग करु शकता. दररोज, एक वही आणि पेन घ्या आणि आपल्या सर्व भावना लिहा. यामुळे तुमचे मन हलके होईल. जे तुम्हाला कोणाला सांगता येत नाही ते तुमच्या डायरीत लिहा. या सर्व गोष्टींबद्दल आपल्या विश्वासू मित्राशी बोला. तुम्हाला काही सांगता येत नसेल तर व्यक्त होण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
दररोज व्यायाम करा
तुम्ही व्यायामही करायला हवा. यामुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते. व्यायाम केल्याने आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. व्यायाम केल्याने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल कमी होतो. आपण दररोज चालणे आणि धावणे देखील करू शकता, यामुळे आपला मूड सुधारण्यास देखील मदत होऊ शकते.
आणखी वाचा – Mahatransco Bharti 2023: महापारेषणमध्ये एकूण 2,541 पदांची भरती, सरकारी नोकरीसाठी आजच करा अर्ज
स्वत:वर काम करा
जेव्हाही तुम्हाला असं काही वाटत असेल की, तुम्ही खुप तणावात आहात तेव्हा तुम्ही ध्यान करा. ध्यान केल्याने तुम्हाला यापासूनही बऱ्याच अंशी आराम मिळेल. असे केल्याने तुम्ही अतिविचार टाळू शकता. यामुळे तुम्हाला कशाची चिंता आहे हे समजून घेणे देखील सोपे होईल. नियमितपणे करत असलेल्या कामाचा आढावा घेणे. स्वत:चा आत्मविश्वास वाढीस लागेल अशा पद्धतीने प्रोत्साहन देणे.