Foods for Iron Deficiency: आपल्या शरीराला प्रथिने आणि जीवनसत्त्वांप्रमाणेच लोहाचीही गरज असते. जेणेकरून शरीर संसर्गाशी लढू शकेल. हिमोग्लोबिनसाठी लोह खूप महत्वाचे आहे. लोहाच्या मदतीने शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. शिवाय स्नायूंच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी देखील हे महत्वाचे आहे. परंतु बहुतांश स्त्रिया लोहाच्या कमतरतेने ग्रस्त असतात आणि पुरेशा प्रमाणात पोषक तत्त्वे न मिळाल्याने अॅनिमियाच्या बळी होतात. शरीरात लोहाची कमतरता असल्यास डाळिंब किंवा बीटरूट खाण्याऐवजी ही फळे आणि पदार्थ खा. लोहाचे प्रमाण वाढू लागेल. (diet for iron deficiency)
वाटाणा
वाटाणा म्हणजे मटार किंवा सुक्या मटारमध्ये लोहाचे प्रमाण १०० ग्रॅममध्ये १.५ मिलीग्राम असते. वाटाणे दररोज पुरेशा प्रमाणात खाल्ले तर दैनंदिन गरजेनुसार लोह उपलब्ध होईल. मटार व्यतिरिक्त सोयाबीन आणि राजमामध्ये देखील लोह आढळते.
खजूर, आलूबुखारा, अंजीर, मनुका
लोहाच्या कमतरतेमुळे एनिमियाचा धोका असतो. अशा परिस्थितीत लोहयुक्त पदार्थ खाणे आवश्यक आहे. खजूर, आलूबुखारा, अंजीर आणि मनुका हे लोहयुक्त पदार्थ आहेत. आलूबुखारा म्हणजे प्लममध्ये लोहाचे प्रमाण जास्त नसले तरी त्यात असलेले व्हिटॅमिन सी शरीराला पुरेसे लोह शोषण्यास मदत करते. अंजीरमध्ये पुरेशा प्रमाणात लोह असते. अंजीरमध्ये २९.४९ मिलीग्राम लोह असते. दररोज एक ते दोन अंजीर दैनंदिन लोहाची गरज पूर्ण करू शकतात.
आणखी वाचा – Viral Video: मुंबई लोकल ट्रेनमध्ये दोन तरुणांचा युनिक स्टार्टअप सोशल मीडियावर व्हायरल
काजू
शरीरात लोहाची कमतरता असल्यास रोज काजू खाणे हा उत्तम पर्याय आहे. काजू खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका नसतो. परंतु प्रति १०० ग्रॅम काजूमध्ये लोहाचे प्रमाण सुमारे ६.६८ मिलीग्राम असते.
काळे तीळ
आयुर्वेदानुसार काळ्या तीळात पांढऱ्या तिळापेक्षा जास्त लोह असते. दररोज थोड्या प्रमाणात काळे तीळ खाल्ल्याने पुरेसे लोह मिळू शकते.