कोरोना अपडेट : देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण कमी होण्याचे नाव घेत नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार, गेल्या 24 तासात देशात कोरोना व्हायरसचे 375 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3,075 वर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की, गेल्या 24 तासात कर्नाटकात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
नव्या व्हेरियंटमुळे कोरोनाचे रुग्ण वाढले
देशात थंडी वाढल्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. नवा व्हेरियंट समोर आल्यानंतर देशात कोविड-19 ची प्रकरणे सातत्याने वाढत होती. मिळालेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर 2023 रोजी एका दिवसात सर्वाधिक 841 नवीन प्रकरणे नोंदली गेली. सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार जेएन 1 व्हेरियंटची प्रकरणे कमी झाली आहेत.
220 कोटींहून अधिक नागरिकांनी घेतली लस
मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, कोविड-19 मधून बरे झालेल्यांची संख्या 4.4 कोटींहून अधिक आहे, राष्ट्रीय रिकव्हरी रेट 98.81 टक्के आहे. देशात आतापर्यंत कोविड लसींचे 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.