इराक : लग्न समारंभ म्हटलं की नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने सहभागी होतात. या लग्न समारंभामध्ये देखील शेकडोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. लग्न समारंभ सुरू असताना अचानक मंडपाच्या छतावरून फुलांऐवजी आगीचे लोळ खाली पडू लागले आणि सर्वांची एकच धावपळ उडाली. या घटनेमध्ये थोडे थोडके नाहीत तर शंभरहून अधिक लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर १५० लोक जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंक वर क्लीक करा : https://x.com/aliqasim/status/1707831899572297797?s=20
लग्न समारंभामध्ये आज-काल वेगवेगळे ट्रेंड केले जातात. डेकोरेशनमध्ये इराक मधील या लग्न समारंभात फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये लग्न मंडपाच्या छतावर अचानक आग लागली आणि आगीचे लोळ खाली कोसळू लागले. या घटनेमध्ये नवरा आणि नवरी दोघं सुरक्षित रित्या बाहेर पडू शकले. पण नवरीच्या संपूर्ण कुटुंबीयांचा मृत्यू ओढवला आहे. तर नवरदेवाच्या आईचा देखील या घटनेमध्ये मृत्यू झाला. तब्बल शंभरहून अधिक वराडी मंडळींना आपला जीव गमवावा लागला असून दीडशे जण जखमी झाले आहेत.