धनादेश भरताना आपण नेहमीच काळजी घेतो. मात्र काहीवेळा किरकोळ चूक झाल्याने धनादेश वठत नाही आणि तो बाऊन्स होतो. या कारणामुळे कदाचित दंडही भरावा लागतो. धनादेश भरताना अनेकांच्या मनात एकच प्रश्न येतो की १,००,००० (एक लाख) रुपये इंग्रजी शब्दांत कसे लिहावे? अनेक जण सामान्यपणे लिहिताना Lakhs (लाख) लिहतात. मात्र काही जण Lac (लॅक) लिहितात. मात्र प्रश्न असा की, धनादेश तयार करताना इंग्रजीत लाख की लॅक लिहावे?
धनादेश लिहताना रक्कम टाकण्यासाठी दोन ठिकाणी जागा असते. एका ठिकाणी रक्कम अंकात टाकतो आणि दुसरी म्हणजे शब्दांत आणि इथेच गडबड होते.
RBI चा नियम काय सांगतो ?
आरबीआयने धनादेशावर लाखचे स्पेलिंग लिहिताना काही खास नियम सांगितलेले नाही. अर्थात बँकेच्या मास्टर सर्कुलरमध्ये म्हटले की, एक लाख रुपये संख्या सांगण्यासाठी Lakhs शब्दांचा वापर करायला हवा. याचाच अर्थ अधिकृत बँकिंग भाषेच्या संदर्भात याच शब्दाचा वापर करणे योग्य आहे. आरबीआयच्या संकेतस्थळानुसार, बँकेकडून जारी केल्या जाणाार्या धनादेशावर Lakhs लिहिलेले असते ना Lac. याचाच अर्थ दोन्ही शब्दांचा वापर करता येतो. मात्र जेव्हा इंग्रजी वापराचा विषय येतो तेव्हा Lakhs याचशब्दांला प्रमाण मानले आहे.
Lac लिहू शकतो का ?
आपण धनादेश तयार करताना Lakhs किंवा Lac लिहू शकता. मात्र जर आपण बँकेचे अधिकारी असाल तर आपल्याला Lakhs लिहावे लागेल, Lac नाही.