ओडिसा : डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्हाला जी औषध दिली जातात ती नेमकी काय आहेत हे एकतर ते लिहिणाऱ्या डॉक्टरला कळतं नाहीतर फार्मासिस्टला ! डॉक्टरांच्या zig-zag अक्षरावरून आत्तापर्यंत अनेक जोक आणि मीन्स पण बनलेले आहेत. पण आता थेट कोर्टानेच आदेश काढले आहेत त्यामुळे आता डॉक्टरांना आपलं अक्षर सुधाराव लागणार आहे.
नुकत्याच ओडिसा उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयानुसार डॉक्टरांनी यापुढे zig-zag लिहिणे बंद करा तसेच डिस्क्रिप्शन ही कॅपिटल अक्षरात स्पष्ट आणि स्वच्छ अक्षरात लिहावी असे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील सर्व डॉक्टर, खाजगी रुग्णालय यांना यापुढे प्रेस्क्रीप्शन तसेच पोस्टमार्टम आणि वैद्यकीय इतर कायदेशीर कागदपत्रांवर स्पष्ट आणि स्वच्छ अक्षरात मजकूर लिहिण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नेमकं प्रकरण काय
डिंकनाल जिल्ह्यामधील हिंदोळ गावातील एका मुलाला साप चावला होता. या मुलाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एका याचीकेची सुनावणी सुरू असताना हायकोर्टाने डॉक्टरांनी प्रेस्क्रीप्शनवर जो मजकूर लिहायचा आहे तो कॅपिटलमध्ये लिहावा यासह स्पष्ट आणि स्वच्छ अक्षरात लिहावा. जेणेकरून सर्वसामान्यांना देखील काय लिहिलं आहे हे सहज वाचता येईल असे लिहिण्याचे आदेश दिले आहेत. अर्थात हा निलयं भारतातील सर्व राज्यांमध्ये देखील करणे आवश्यक आहे.