बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफचा बहूप्रतिक्षित चित्रपट टायगर 3 प्रदर्शित झालाय. दिवाळीनिमित्त या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होतेय. चाहत्यांची पंसती पाहायला मिळत आहे. सलमानने ‘जवान’ आणि ‘गदर 2’ला मागे टाकलं आहे असं देखील सांगण्यात येत आहे. 12 नोव्हेंबर रोजी ब्लॉकबस्टर ओपनिंगनंतर आता ‘टायगर 3’ने दुसऱ्या दिवशीही तुफान कमाई केली आहे.
चित्रपटगृहात फटाके फोडत काही चाहत्यांनी चित्रपट पाहिला. दुपारी 3 वाजे पर्यंत या शोनं खूप कमाई केली पण त्यानंतर प्रेक्षकांची संख्या कमी झाली. त्याचं महत्त्वाचं कारण हे लक्ष्मी पूजन होतं. हेच कारण आहे की सलमानच्या करिअरमध्ये सगळ्यात जास्त कमाई करणारा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. Sacnilk नं दिलेल्या माहितीनुसार, ‘टाइगर 3’ नं पहिल्याच दिवशी सगळ्या भाषांमध्ये 44.50 कोटी कमाई केली आहे. रविवारी मॉर्निंग शोमध्ये 36.55% लोक होते. तर दुपारच्या शोमध्ये आणखी प्रेक्षक आले होते आणि त्यावेळी 42.73% प्रेक्षक थिएटरमध्ये होते. संध्याकाळी प्रेक्षक कमी झाले. रात्रीच्या शोमध्ये 46.18% प्रेक्षक होते.
त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी 57.50 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे दोन दिवसांत या चित्रपटाच्या कमाईचा आकडा 100 कोटींपेक्षा अधिक झाला आहे. सलमान आणि कतरिनाचा ‘टायगर 3’ हा चित्रपट आता सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या दिवसाच्या कमाईत ‘टायगर 3’ने शाहरुख खानचा ‘जवान’ आणि सनी देओलच्या ‘गदर 2’ला मागे टाकलं आहे.
‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ हे पहिले दोन्ही भाग बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले होते. त्यामुळे तिसऱ्या भागाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. म्हणूनच सुरुवातीपासूनच ‘टायगर 3’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष शर्मा आहेत तर या चित्रपटात तुम्हाला सलमान खान आणि कतरिना कैफसोबतच इमरान हाश्मीला ही मुख्य भूमिकेत आहे. तर शाहरुख खान देखीलचा कैमिओ पाहायला मिळणार आहे. याशिवाय रेवती, सिमरन, रिधी डोग्रा, विशाल जेठवा, कुमूद मिश्रा, रणवीर शौरी आणि आमिर बशीर यांच्याही भूमिका आहेत.
सलमान खानचे अनेक चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले आहेत. 2015 मध्ये प्रदर्शित झालेला प्रेम रतन धन पायो असो किंवा 2019 मध्ये प्रदर्शित झालेला भारत चित्रपट असो या चित्रपटांना ‘टायगर 3’ने मात दिली आहे. ‘भारत’ने 42.30 कोटी रुपये आणि ‘प्रेम रतन धन पायो’ने 40.35 कोटी रुपये पहिल्या दिवशी कमावले होते.