#Netflix : आगामी स्पाय थ्रिलर चित्रपट ‘इंटेलिजन्स’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा होताच चित्रपटातील पात्रांची पहिली झलक दाखविण्यात आली. आता आज म्हणजे 14 सप्टेंबरला या चित्रपटाचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे.
आगामी स्पाय थ्रिलर चित्रपट ‘इंटेलिजन्स’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा होताच चित्रपटातील पात्रांची पहिली झलक दाखविण्यात आली. आता आज म्हणजे 14 सप्टेंबरला या चित्रपटाचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे.
‘इंटेलिजन्स’ चित्रपटाच्या या टीझरमध्ये अली फजल एका पेपरचा फोटो कॉपी करताना दिसत आहे. तर तब्बू कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांच्यावर नजर ठेवताना दिसत आहे. यानंतर मशीनमधून पेपर बाहेर येतो आणि त्यावर ‘इंटेलिजन्स’ आणि टॉप सिक्रेट लिहिलेले दिसते. यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही या टीझरच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. चित्रपटाचा टीझर शेअर करताना लिहिलं आहे की, ‘काही गुपित असेल तर बरं, राज, पण हे नाही.’
हा टीझर पाहता विशाल भारद्वाजचा ‘इंटेलिजन्स’ हा चित्रपट पुढील महिन्यात ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असल्याचे समजते. सस्पेन्सने भरलेला हा टीझर पाहिल्यानंतर चाहते खूप चकीत झाले आहेत. त्यामुळे आता त्याचा ट्रेलर आणि चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा आहे.










