मुंबई : राखी सावंत Rakhi Sawant हिच्यावर नुकतीच एक मोठी शस्त्रक्रिया पार पडली. डॉक्टरांनी तिच्यावर तीन तास शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या गर्भाशयातील ट्युमर काढला आहे. यानंतर तिचे मेडिकल चेकअप होणार असून हा ट्यूमर कॅन्सरचा होता का ? हे तपासले जाईल असे डॉक्टर्सनी सांगितल आहे.
दरम्यान सध्या तिच्यासोबत तिचा पूर्वपती रितेश सिंह हा असून त्याने एक पोस्ट सोशल मीडियावर केल्याने ही माहिती खरी असल्याचं नेटकऱ्यांना पटलं आहे. रितेश सिंह यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आम्ही देवाकडे प्रार्थना करतोय की तो ट्युमर कॅन्सरचा असू नये. जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर आम्ही तिला उपचारासाठी परदेशात घेऊन जाऊ. मी एक पूर्व पती म्हणून नाही तर मित्र म्हणून राखीची काळजी घेतोय”, असंदेखील रितेश म्हणाला. यासोबतच त्याने राखीला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचाही खुलासा केला आहे. याप्रकरणी त्याने पोलिसांकडे तक्रार केली आहे. रितेशन अप्रत्यक्षपणे राखीचा पूर्व पती आदिल खान दुर्रानीवर आरोप केले आहेत. “हे सर्वांनाच माहीत आहे की आमचा शत्रू कोण आहे? मी त्या व्यक्तीविरोधात तेव्हाच बोलेन, जेव्हा माझ्याकडे पुरावे असतील. आम्ही मीडिया ट्रायल करणार नाही, थेट पोलिसांची मदत घेऊ”, अस त्याने म्हंटल आहे.
https://www.instagram.com/reel/C7GOb07I9Is/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान काही दिवसांपूर्वी पूनम पांडे हिने देखील पब्लिसिटी स्टंट केला होता. सर्वाइकल कॅन्सरने निधन झालं असल्याच खोटं तिने सांगितलं होतं. दरम्यान आता राखीन देखील असंच काही केलं आहे का ? अशी शंका नेटकरी व्यक्त करत आहेत. तिला काही दिवसांपासून धमक्या देखील येत असल्याचं तिच्या वकिलांनी सांगितलं होतं. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर ती याविषयी तक्रार करीन असेही सांगितलं होत. त्यामुळे हा पब्लिसिटी स्टंट होता असं अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं होतं. पण आता तिच्या पूर्वपतीने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यामुळे राखी सावंत वर खरंच शस्त्रक्रिया झाली आहे.