नागपूर : नागपूरमध्ये Nagpur हिवाळी अधिवेशन Winter Session आजपासून सुरू झाल आहे. पुढचे दहा दिवस महाराष्ट्रातील विविध विषयांवर चर्चा आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी होणार आहे. दरम्यान आज पहिल्याच दिवशी प्रवीण दरेकर यांनी विधानसभेत मराठी चित्रपटांवरून उचललेल्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी मोठं आश्वासन दिल आहे.
तर झालं असं की, लवकरच हास्य जत्रा या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या कलावंतांचा ” एकदा येऊन तर बघा ” हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. परंतु या चित्रपटाला थिएटर उपलब्ध होत नाहीयेत. दरम्यान हा मुद्दा प्रवीण दरेकर यांनी आज विधानसभेत मांडला. प्रवीण दरेकर म्हणाले की, ” एकदा येऊन तर बघा ” या चित्रपटाला थिएटरमध्ये शो मिळत नाहीयेत. आठ डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होत आहे. पण काही दादा लोक आहेत जे या मराठी सिनेमाला सिनेमागृह मिळू देत नाहीत.”
या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठ आश्वासन दिल आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ” प्रसाद खांडेकर हे गुणी कलावंत आहेत. हास्य जत्रेच्या माध्यमातून त्यांनी गेली अनेक वर्ष लोकांच्या मनावर पगडा निर्माण केला आहे. त्यांच्या सिनेमाला जर सिनेमागृह उपलब्ध होत नसेल तर गरज पडल्यास कायदेशीर कारवाई करू…!” असे देखील यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी थेट भाषेत खडसावल आहे.
महाराष्ट्र ही जशी ऐतिहासिक, आर्थिक स्तरावर खंबीर भूमी आहे तशीच या मातीत जन्म घेणारा कलाकार देखील सिनेसृष्टीमध्ये नाव अजरामर करतो आहे. आज मराठी कलावंत बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील आपलं नाणं खणखणीत वाजवत आहेत. पण ज्या पद्धतीने हिंदी चित्रपटांना सिनेमागृह मिळतात त्याचबरोबर ओटीपी प्लॅटफॉर्मवर देखील सहज शो मिळतात, त्या बरोबरीने मराठी चित्रपटांची मात्र अवहेलनाच केली जाते. आज याच मुद्यावरून थेट हिवाळी अधिवेशनात थेट उपमुख्यमंत्र्यांनी म्हंटले कि, ” जर थिएटर मराठी चित्रपटांना उपलब्ध झालं नाही तर कारवाई करू…!” असं आश्वासन दिले त्यामुळे मराठी कलावंतांना दिलासा मिळाला आहे.
” एकदा येऊन तर बघा ” हा चित्रपट उद्या रिलीज होतो आहे. प्रसाद खांडेकर यांनी आपल्या या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून प्रसाद खांडेकर यांचा हा पहिला सिनेमा असून यामध्ये गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, तेजस्विनी पंडित, ओंकार भोजने, विशाखा सुभेदार, वनिता खरात कलावंतांच्या प्रमुख भूमिका आहेत.