प्रेक्षकांना चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहायला आवडतात. मात्र कोरोना महामारीमुळे दोन वर्ष चित्रपटगृहे बंद होते. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी कोलमडली होती. मात्र कोरोना काळानंतर सर्व परिस्थिती ठीक झाली आणि पुन्हा एकदा सिनेसृष्टीला नव्याने पालवी फुटली. मात्र कोरोना काळात चित्रपटगृह बंद असल्याने विविध ओटीटी प्लॅटफॉर्म उदयास आले. या काळात प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मला चांगली पसंती दिली.
मात्र कोरोना काळानंतर (Corona) चित्रपटगृहे पुन्हा सुरु झाल्यास प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहामध्ये खेचून आणणे मल्टीप्लेक्सच्या मालकांसाठी आणि चित्रपट निर्मात्यांसाठी फारच कठीण होते. मात्र प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मला फाटा देऊन पुन्हा चित्रपटगृहात गर्दी केली. यामुळे चित्रपट निर्माते आणि मल्टीप्लेक्स मालक निश्चिन्त झाले.
अशातच 13 ऑक्टोबरला राष्ट्रीय चित्रपट दिवस असल्याने रसिकांसाठी मल्टीप्लेक्स असोशियन्सच्यावतीने एक खास ऑफर आयोजित केली होती. या ऑफरमध्ये सिनेप्रेमींना अवघ्या 99 रुपयांमध्ये चित्रपटाचा आनंद घेता आला आहे. तसेच या ऑफरला राज्यातील बहुतांश प्रेक्षकांनी हजेरी लावल्याने मल्टीप्लेक्स असोशियन्सला याचा फायदा देखील झाला आहे.
मात्र आता सिनेप्रेमींना मल्टिप्लेक्स कंपनी PVR INOX Ltd ने पुन्हा एक भन्नाट ऑफर्स आणली आहे. या ऑफर्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना एका खास पासची घोषणा केली आहे. या ऑफर पासमध्ये प्रेक्षकांना एका महिन्यामध्ये दहा चित्रपट पाहता येणार आहे. यासंदर्भात PVR INOX ने अधिकृत घोषणा केली आहे. तर तुम्हालाही या खास ऑफर्सचा आनंद घेयचा असेल तर तो कसा घेणार आणि हा पास कसा काढायचा यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात…
PVR INOX ने घोषणा केलेल्या माहितीनुसार, प्रेक्षकांना मासिक सबस्क्रिप्शन पासचा लाभ आजपासून म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. हा पास प्रेक्षकांना 699 रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच या पासवर प्रेक्षकांना 699 मध्ये एक महिन्यात 10 चित्रपट पाहता येणार आहे. PVR INOX ने या ऑफरला पासपोर्ट नावाची सेवा असे नाव दिले आहे. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे या ऑफर्सचा फायदा प्रेक्षकांना आठवड्यात फक्त सोमवार ते गुरुवार या कालावधीतच मिळणार आहे.
मल्टिप्लेक्स कंपनी PVR INOX Ltd ने घेतलेला निर्णय हा ग्राहकांना वारंवार थिएटरला भेट देण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने घेतला आहे. यामध्ये IMAX, Gold, LUXE आणि Director’s Cut सारख्या प्रीमियम ऑफर वगळल्या जाणार आहेत. या पासपोर्ट ऑफर्सचा फायदा घेण्यासाठी प्रेक्षकांना ‘PVR INOX पासपोर्ट’ कंपनीच्या अॅप किंवा वेबसाइटवरून पास काढता येणार आहे. महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांना किमान 3 महिन्यांच्या सदस्यता कालावधीसाठी हा पास खरेदी करता येणार आहे. यासंदर्भात पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्ता यांनी अहवालात माहिती दिली आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये रिलीज होणारे चित्रपट :
चित्रपट : दोनो
रिलीज तारीख : 5 ऑक्टोबर 2023
दिग्दर्शक : अवनीश बड़जात्या
चित्रपट : ‘थँक यू फॉर कमिंग’
रिलीज तारीख : 6 ऑक्टोबर 2023
दिग्दर्शक : करण बुलानी
चित्रपट : ‘मिशन राणीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू’
रिलीज तारीख : 6 ऑक्टोबर 2023
दिग्दर्शक : टिनू देसाई
चित्रपट : ‘अंकुश’
रिलीज तारीख : 6 ऑक्टोबर 2023
दिग्दर्शक : निशांत नथाराम धापसे
चित्रपट : ‘धक-धक’
रिलीज तारीख : 13 ऑक्टोबर 2023
दिग्दर्शक : तरुण दुधेजा
चित्रपट : ‘लिओ’
रिलीज तारीख : 19 ऑक्टोबर 2023
दिग्दर्शक : लोकेश कनागराज
चित्रपट : ‘गणपत’
रिलीज तारीख : 20 ऑक्टोबर 2023
दिग्दर्शक : विकास बहल
चित्रपट : ‘बॉईज 4’
रिलीज तारीख : 20 ऑक्टोबर 2023
दिग्दर्शक : विशाल सखाराम देवरुखकर
चित्रपट : ‘यारियां-2’
रिलीज तारीख : 20 ऑक्टोबर 2023
दिग्दर्शक : विनय सप्रू आणि राधिका राव
चित्रपट : ‘तेजस’
रिलीज तारीख : 27 ऑक्टोबर 2023
दिग्दर्शक : सर्वेश मेवारा
चित्रपट : ‘लंडन मिसळ’
रिलीज तारीख : 27 ऑक्टोबर 2023
दिग्दर्शक : जालिंदर कुंभार