गौतमी पाटील : गौतमी पाटील Goutami Patil हे नाव आज सर्वज्ञात आहे. गौतमी एक लावणी Lavani कलावंत आहे. सौंदर्य आणि नृत्य कलेमध्ये पारंगत असणाऱ्या गौतमीला तिच्या काही हावभवामुळे काही दिवसांपूर्वी प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर गौतमीने माफी देखील मागितली आणि तो वाद काही दिवसात शमला देखील. परंतु गौतमीचा नृत्याचा कार्यक्रम ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी अगदी पोलीस बंदोबस्त देखील ठेवावा लागतो अशी आज तिची ओळख आहे.
हे वाचलेत का ? Randeep Hooda’s Wife: रणदीप हुड्डाची बायको लिन लैशराम आहे तरी कोण?
पण आता केवळ स्टेजवर गाण्यावर थिरकणारी गौतमी अभिनय क्षेत्रात पदार्पण करते आहे. येत्या पंधरा डिसेंबर रोजी गौतमीचा पहिला वहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये गौतमीने कलावंताची भूमिका केली आहे. तिच्या चहात्यांना या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागली असतानाच या चित्रपटाचा ट्रेलर देखील लाँच झाला आहे. पहा हा ट्रेलर…
गौतमी पाटील ही एक तमाशा कलावंत आहे. ही सुंदर नृत्यांगना लवकरच घुंगरू या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करते आहे. गौतमीचा घुंगरू हा पहिला वहिला चित्रपट तमाशा लोककलावंत यांच्या जीवनाचं वास्तव मांडणार आहे. येत्या पंधरा डिसेंबरला राज्यातील तब्बल 100 स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आज पंढरपूर या ठिकाणी या चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहे.
घुंगरू हा चित्रपट बाबा गायकवाड यांनी दिग्दर्शित केला आहे. महत्त्वाचे म्हणजे घुंगरू या चित्रपटांमध्ये गौतमी पाटीलच्या आयुष्याचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. देशातील सात राज्यांमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण पार पडल असून इतर भाषांमध्ये देखील या चित्रपटाचे डबिंग केले जाणार आहे. या सिनेमाची कथा पटकथा देखील बाबा गायकवाड यांनीच लिहिली आहे. तर मुख्य भूमिकेत देखील बाबा गायकवाड हेच भूमिका करत आहेत. त्यासह सुदाम केंद्रे ,उषा चव्हाण वैभव गोरे, शितल गीते या देखील कलाकारांचा चित्रपटांमध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. येत्या 15 डिसेंबरला गौतमीचे चाहते तिच्या लावणीसह तिच्या आयुष्याचा संघर्ष पाहण्यासाठी चित्रपटगृहात येतिल असं म्हणायला हरकत नाही.