मुंबई : तारा सिंगच्या भूमिकेत सनी देओल आणि सकीनाच्या भूमिकेत अमीषा पटेल स्टारर ‘गदर – एक प्रेम कथा’ हा ब्लॉकबास्टर चित्रपट झी द्वारे 9 जून 2023 रोजी पुन्हा रिलीज करण्यात आलाय. सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या या चित्रपटाने 21 वर्षांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये इतिहास रचला होता. आता हा चित्रपट री-रिलीज झाल्यानंतर पुन्हा एकदा “हमारा हिंदुस्थान झिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा”, अशा घोषणा थिएटरमध्ये ऐकू आल्या.
गेल्या शुक्रवारी(९ जून) हा चित्रपट 4K रिझोल्यूशन आणि इमर्सिव डॉल्बी अॅटमॉस आवाजात पुन्हा रिलीज केला गेला. विशेष म्हणजे यावेळी तिकीटाची किंमत रु. 150 पेक्षा जास्त नव्हती आणि 1 तिकीटावर 1 तिकीट मोफत अशी ऑफर देखील देण्यात होती.
चाहत्यांनी थियेटरमध्ये धरला ठेका
सनी देओलचे चाहते थिएटरमध्ये तारा सिंगसाठी क्रेझी होताना पाहायला दिसले. गदर 2023 मध्ये री-रिलीझ झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उर्जा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. सनी देओलचे चाहते ‘मैं निकला गड्डी लेके’ हे गाण लागताच थिएटरमध्ये धुमाकूळ घालताना दिसले.
आता गदरचा सीक्वल रिलीज करण्याची जोरदार तयारी सुरू आहे. या वर्षी ११ ऑगस्ट रोजी गदर २ रिलीज होणार आहे. गदर प्रमाणेच त्याचा सिक्वल देखील हिट ठरतो का हे लवकरच पाहायला मिळेल. (Gadar 2 release date)
गदर री-रिलीजचे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Gadar Re- released box office collection)
हा चित्रपट देशभरातील 218 शहरांमधील 445 सिनेमागृहांमध्ये 835 शोमध्ये पुन्हा रिलीज करण्यात आला आहे. रिलीजनंतरच्या तीनच दिवसांत या चित्रपटाने १.३२ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.
दिवस 1 : 26 लाख
दिवस 2 : 46 लाख
दिवस 3 : 60 लाख
एकूण: 1.32 कोटी
गदर-एक प्रेम कथा या चित्रपटाचे री-रिलीजसह आतापर्यंतचे एकूण कलेक्शन भारतात 76.88 कोटी रुपये इतके आहे. हा चित्रपट 22 वर्ष जुना आहे. 15 जून 2001 मध्ये हा चित्रपट पहिल्यांदा रिलीज करण्यात आला होता.
गदर-एक प्रेम कथा ओरिजिनल रिलीज – इंडिया बॉक्स ऑफिस कलेक्शन
गदर सिनेमा २००१ मध्ये रिलीज करण्यात आला तेव्हा पहिल्या दिवशी १.४ कोटी रुपयांची ओपनिंग मिळाली होती. नंतर मात्र सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.
ओपनिंग डे – 1.4 कोटी
ओपनिंग वीकेंड – 4.08 कोटी
ओपनिंग वीक – 9.28 कोटी
गदर – एक प्रेम कथा बजेट (Gadar movie budget)
गदर – एक प्रेम कथा हा चित्रपट 19 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवल्याचा अंदाज आहे. सनी देओल, अमिषा पटेल यांची दु:खद प्रेमकहाणी अजूनही नेटिझन्सना ‘गुजबंप्स’ देते. सनी देओल आणि अमीषा पटेल स्टारर गदर चित्रपट बावीस वर्षांनंतर पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सकीना आणि तारा सिंगच्या दुःखद प्रेमकथेचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांना आमंत्रित केले गेले.
चाहत्यांनी सकीना आणि तारा सिंगच्या दु:खद प्रेमकथेचे पुन्हा एकदा साक्षीदार होताना तसेच प्रत्येक भावना अनुभवण्यात कोणतीही कसर सोडली नाहीये. आता चाहते या चित्रपटाच्या सिक्वलची आतुरतेने वाट बघत आहे.