अहमदनगर : अहमदनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. या बातमीमधून नेमकं काय घ्यायचं हे तुम्हीच ठरवा. तर झालं असं आहे की, अहमदनगरच्या एका शाळेत सातवीत शिकणाऱ्या मुलीचं दहावीत शिकणाऱ्या मुलाशी प्रेम प्रकरण होतं. हे दोघेजण एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते की यातून ही सातवीचे शिक्षण घेणारी चिमुरडी गरोदर राहिली. ही गोष्ट दोन्हीही कुटुंबांना कळाल्यानंतर कुटुंबीयांनी या दोघांचं लग्न लावून दिले. पण अर्थात आता सगळं काही चांगलं होईल असं फक्त कुटुंबीयांनाच वाटत होतं. कारण जेव्हा या मुलीची डिलिव्हरी झाली, तिने सुखरूप पणे एका मुलाला जन्म दिला. पण या मुलीचं वय कमी असल्याच डॉक्टरांपासून लपणार नव्हतं. डॉक्टरांनी ही माहिती पोलीस स्टेशनला कळवली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस रुग्णालयात दाखल झाले. यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास केल्यानंतर कायद्यानुसार या विवाहाला संमती नाही. हा बालविवाह ठरतो म्हणून कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे. त्याशिवाय मुलगी लहान असल्याकारणाने तिच्यावर अत्याचार केल्याचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान सध्या घारगाव पोलीस स्थानकामध्ये हा गुन्हा दाखल असून अधिक तपास आणि चौकशी सुरू आहे. परंतु या घटनेतून मुलांची आणि मुलींची बदलती मानसिकता, पालक म्हणून आपण कुठेतरी चुकतोय का, कमी पडतोय का ? आणि खरंच या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकी चूक कोणाची हे ठरवणं पण तेवढेच कठीण आहे.