पुणे : पुणे पोर्शे कार एक्सीडेंटने Pune Car Accident झालेल्या दोघा तरुणांच्या मृत्यूनंतर प्रकरण चांगलंच चिघळलेलं आहे. सध्या प्रमुख आरोपी वेदांत यासह विशाल आणि सुरेंद्र अग्रवाल या अग्रवाल खानदानाच्या तीनही पिढ्या तुरुंगात आहेत. दरम्यान बदलले गेलेले ब्लड सॅम्पल हे एका महिलेचे होते असं ससूनच्या चौकशी समितीच्या अहवालात निष्पन्न झाल आहे. त्यामुळे हे ब्लड सॅम्पल Blood sample लाडोबा वेदांतच्या आईचे म्हणजेच शिवानी अग्रवाल हिचे होते का असा सवाल आता उपस्थित होतो आहे.
पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत या अपघात प्रकरणी अगरवाल खानदानाच्या तीन पिढ्या, ससून मधील दोन डॉक्टर आणि एक कर्मचारी, पोलीस यांच्यावर कारवाई केली आहे. अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. पण यामध्ये अद्याप शिवानी अग्रवाल यांची चौकशी मात्र झालेली नाही. तर आता हे ब्लड सॅम्पल महिलेचे असल्याचा अहवाल चौकशी समितीने दिला आहे. या अहवालानंतर ही महिला म्हणजे लाडोबाची आई शिवानी अग्रवाल हिचेच ब्लड सॅम्पल होते का ? अशी चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत गरज पडेल तेव्हा शिवानी अग्रवाल यांची चौकशी केली जाईल असं पुणे पोलिसांनी सांगितलं होतं.
सध्य परिस्थिती पाहता शिवानी अग्रवाल यांची चौकशी होऊ शकते असे संकेत असतानाच शिवानी या गायब झाल्या असल्याचं देखील समजत आहे. तसेच चार तारखेला लाडोबाची कोठडी संपत असल्याने शिवानी अग्रवाल निरीक्षणगृहात मुलाला भेटण्यासाठी येऊ शकते.