कलकत्ता : रामेश्वरम कॅफे ब्लास्ट प्रकरणी एक मोठी बातमी समोर येते आहे. या कॅफेतील ब्लास्ट एनआयएने NIA मास्टरमाइंडच्याच मुस्क्या आवळल्या आहेत. अब्दुल मतीन ताहा असं या ब्लास्ट मागील मुख्य सूत्रधाराचं नाव आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने पश्चिम बंगाल कलकत्ता मधून शुक्रवारी दोघा जणांना ताब्यात घेतलं. यामध्ये मुसावीर हुसेन शहाजीब आणि अब्दुल मतीन तह या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे.
Nashik : ” कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा निरर्थक ! ” छगन भुजबळ यांनी स्पष्ट सांगून टाकलं
मिळालेल्या माहितीनुसार हे दोन आरोपी आपली खरी ओळख लपवून राहत होते या आरोपींपैकी मुसावीर हुसेन शहाजीब यानेच कॅफेमध्ये आयडी IED ठेवलं होतं. आणि या संपूर्ण कटामागे अब्दुल मतीन तहा याचा हात होता.
रामेश्वरम मधील या कॅफेमध्ये एक मार्चला बॉम्बस्फोट झाला होता. एनआयए हा तपास करत होती. दरम्यान दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे . या स्फोटामध्ये अनेक जण जखमी झाले होते. अधिक तपस सुरु आहे.