तलाठी परीक्षा : तलाठी परीक्षा Talathi Exam पार पडली. या परीक्षेत मोठी चूक झाली आहे. प्रश्नपत्रकेतील प्रश्नच चुकल्याने परीक्षा केंद्रात संभारामचे वातावरण होते. दरम्यान एक-दोन नाही तर तब्बल 114 प्रश्न चुकले आहेत. तलाठी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न आल्यास त्याचे सरसकट गुण देण्याचे तलाठी परीक्षा राज्य समन्वयकाकडून जाहीर करण्यात आले होते.
या परीक्षेतील प्रश्नसुचीवर उमेदवारांकडून आक्षेप मागविण्यात आले होते. त्यात तब्बल 114 प्रश्न चुकीचे असल्याचे निष्पन्न झाले. या चुकीच्या प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्यात येणार असल्याचे तलाठी परीक्षा राज्य समन्वयकाकडून जाहीर करण्यात आले आहे.
नेमके प्रकरण काय ?
▪️ राज्यात मागील काही महिन्यांपूर्वी 4 हजार 446 तलाठी पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी 10 लाख 41 हजार 713 अर्ज प्राप्त झाले होते. प्रत्यक्षात 8 लाख 64 हजार 960 उमेदवार परीक्षेला बसले होते. अर्जांची संख्या जास्त असल्याने भूमी अभिलेख विभागाने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित केले होते.
▪️ त्यानुसार पहिला टप्पा 17 ते 22 ऑगस्ट, दुसरा टप्पा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर तर तिसरा टप्पा 4 ते 14 सप्टेंबरमध्ये राबविण्यात आला. त्यासाठी परीक्षेची एकूण 57 सत्रे घेण्यात आली. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसुचीबाबत आक्षेप, हरकती नोंदविण्यासाठी 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर असा कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार 2 हजार 831 प्रश्नांवर 16 हजार 205 आक्षेप प्राप्त झाले. यापैकी 9 हजार 72 आक्षेप मान्य करण्यात आल्याची माहिती नरके यांनी दिली.
दरम्यान, या परीक्षेत 114 प्रश्न किंवा उत्तरे चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचे पूर्ण गुण देण्याचा निर्णय झाला आहे. भूमी अभिलेख विभागाने गुणसुची तयार केली आहे. अंतिम निर्देश आल्यानंतर ती जाहीर होणार. त्यानंतर निवडसुची जाहीर केली जाईल, असे सूचित करण्यात आले आहे.