महाराष्ट्र : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या मंगळवार दिनांक 21 मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा निकाल घोषित होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून आज ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी मार्च 2024 साठी घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवार दिनांक 21 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील संख्येत स्थळांवर जाऊन निकाल तपासायचा आहे.
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
http://results.targetpublications.org
फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये बारावीसाठी 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. दरम्यान जुलै ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सोमवार दिनांक 27 मे पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने आवेदन करायचे आहे. अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे.