India vs Australia Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया India vs Australia Final यांच्यात वर्ल्ड कप 2023 (2023 World Cup) चा अंतिम सामना खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. रोहित शर्माने येथे नेहमीप्रमाणे वेगवान सुरुवात केली, पण तो ४७ धावांवर बाद झाला. गिल आणि श्रेयस अय्यर निराश झाले. दोघेही अवघ्या चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले.
हे वाचलेत का ? World Cup 2023 Prize Money : विश्वचषक जिंकणाऱ्या संघावर पडणार कोट्यवधींच्या बक्षिसांचा पाऊस; उपविजेत्या संघाची देखील मोठी कमाई
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा अंतिम सामना पाहण्यासाठी जगभरातून चाहते दाखल झाले आहेत. यातील एक चाहते पॅलेस्टाईनमधून भारतात आले आहेत. तो विराट कोहलीचा इतका मोठा चाहता आहे की त्याने स्टेडियमची सुरक्षा तोडून विराटला भेटण्यासाठी मैदानात उतरले. मात्र, सुरक्षा रक्षकाने त्याला तत्काळ मैदानाबाहेर काढले.
भारतीय डावाच्या 14 व्या षटकात ही घटना घडली. जेव्हा पॅलेस्टाईनचा एक समर्थक मैदानात उतरला आणि त्याने विराट कोहलीची भेट घेतली तेव्हा मैदानाच्या गार्डला मुक्का मारला. खरं तर गाझामध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करणं हा चाहत्याचा उद्देश होता. चाहत्याने घातलेल्या टी-शर्टवर ‘पॅलेस्टाईनवर हल्ला करणे थांबवा’ असे स्लोगन लिहिले होते.
हे वाचलेत का ? 2023 World Cup : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली 54 धावांवर बाद; भारताला मोठा धक्का
हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मैदानात उतरले
हमास आणि इस्रायल या दहशतवादी संघटनेत युद्ध सुरू आहे. इस्रायलने गाझामध्ये हमासच्या दहशतवाद्यांवर हल्ले केले. जिथे पॅलेस्टिनी समर्थकही मारले गेले. या हल्ल्याच्या निषेधार्थ पॅलेस्टिनी समर्थक या मोठ्या व्यासपीठावरून आंदोलन करण्यासाठी मैदानात उतरले.