मुंबई : आताच मिळालेल्या बातमी नुसार खिचडी घोटाळा प्रकरणी सुरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ED कोठडी सुनावण्यात आली आहे. नेमका हा कथित खिचडी घोटाळा काय आहे हे जाणून घेऊयात…

नेमकं काय आहे खिचडी घोटाळा प्रकरण ?
- कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी आणि कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची सोया व्हावी यासाठी खिचडी वाटप करण्याचे नियोजन राज्य शासनाने केले होते.
- या खिचडी वाटपाच्या नियोजनाला केंद्र सरकारने देखील पाठिंबा दिला होता.
- मुंबई महापालिकेने 52 कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं.
- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या खिचडी वाटपामध्ये घोटाळा झाल्याचे म्हंटले होते.
- या प्रकरणी तपास सुरु असून आज कॉनट्रकटर सुरज चव्हाण यांना आज ED कोठडी सुनावण्यात आली आहे.
- सुरज चव्हाण हे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत.