पुणे : थर्टी फर्स्ट डिसेंबर 31 December पुण्यामध्ये जोरदार पद्धतीने साजरा करण्यात आला. अर्थात जगभरामध्ये नवीन वर्षाचं स्वागत सर्वांनीच केलं. आणि या स्वागतासाठी जास्तीत जास्त लोकांनी सोबती निवडली ती दारू… पण दारूची नशा ही केवळ आर्थिक नुकसान आणि व्यक्तिमत्त्वाचे हनन करते. पुण्यात वानवडी परिसरामध्ये एका महिलेने दारूच्या नशेत राहत्या सोसायटीमध्येच चांगलाच धुडगूस घातला आहे. .
31 डिसेंबरच्या रात्री ही तरुणी पार्टी करून घरी आली यानंतर गेटवरच या महिलेने आरडाओरडा करायला आणि धुडगूस घालायला सुरुवात केली. वॉचमनने या महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणत्याही मानसिकतेत ही महिला नव्हती. अशावेळी सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन या महिलेला ताब्यात घेतले.
धक्कादायक म्हणजे या महिलेने पोलीस आल्यानंतर देखील महिला पोलिसाला देखील धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचं समजतं आहे. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाला आहे.