बीड : सरकार आणि मराठा आरक्षणासाठी Maratha reservation उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्यामध्ये शिष्टमंडळाच्या मध्यस्थीने बैठकी पार पडल्या. मराठा आरक्षण यावर लवकरच योग्य तो सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन यांच्यावतीने शिष्टमंडळाने दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले होते. तसेच 23 डिसेंबर पर्यंत राज्य सरकारने निर्णय घ्यावा असा अल्टिमेटम देखील जरांगे पाटील यांनी दिला होता. दरम्यान अद्याप देखील राज्य सरकारने तोडगा काढला नसल्याने तसेच राज्य सरकारचे शिष्ट मंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांची मंगळवारी झालेल्या बैठकल्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे.
मंगळवारी झालेली मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतची या शिष्ट मंडळाची बैठक सगेसोयरे या शब्दामुळे फीस्कटली होती. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. परंतु सरसकट ओबीसी आरक्षण मराठ्यांना दिले जावे. अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या मागणीवर जरांगे पाटील ठाम असून राज्य सरकारच्या भूमिकेवर त्यांनी सडेतोड टीका केली आहे.
काही वेळातच बीड मधील सभा सुरू होणार आहे यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की,”किती दिवस आम्हाला आरक्षणासाठी झुलवत ठेवणार. आजच्या सभेत सर्वकाही सांगणार आहे. संयम किती दिवस पाळायचा आम्हालाही मर्यादा आहे. सरकारच्या हातात आजचा आणि उद्याचा दिवस आहे. सरकारने लिहिलेले शब्द सरकार पाळत नाही. आजच्या सभेतून मराठा समाजासमोर सर्व सत्य मांडणार आहे. मराठा समाजाने आणखी किती दिवस अन्याय सहन करायचा. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी आमची आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही आरक्षण मागत आहोत,” असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.