Trending : हिवाळा winter म्हटलं की धुकं Fog पडणारच… पण डोळ्याला जितकं अल्हाददायक हे धुकं वाटतं घाटातून मात्र प्रवास करताना समोर येणार धुकं तितकचं घातक असू शकत. आज जाणून घेऊयात की पहाडी भागात घाट रस्त्याने प्रवास करताना जर दाट धुकं पडलं असेल तर वाहन चालवताना नेमकी कशी काळजी घ्यायची आहे.
१. तर सर्वात प्रथम गाडीच्या फ्रंट ग्लासवर आणि बॅक ग्लासवर फॉग साठणार नाही याची काळजी घ्यायची आहे. यासाठी एसी चालू करा, ज्याचा प्रवाह काचेच्या दिशेने जाईल यामुळे काही क्षणातच फॉग दूर होईल.
२. धुकं जर दाट असेल तर गाडीचे वायपर चालू ठेवा.
३. न विसरता सर्वात प्रथम गाडीचे पार्किंग लाईट चालू ठेवूनच गाडी चालवा. जोपर्यंत दाट धुकं आहे तोपर्यंत पार्किंग लाईट चालू ठेवा, जेणेकरून लाल रंगाच्या पार्किंग लाईटमुळे तुमची गाडी इतर वाहन चालकांना कायम व्हीसीबल राहील.
४. गाडी अति सावकाश आणि अतिवेगात देखील चालवू नका. समोरच धुकं कापलं गेलं पाहिजे. या अंदाजाने सुरक्षितपणे गाडी चालवा. ज्या ठिकाणी वळण येथे आहे, त्या ठिकाणी अप्पर डीप्पर द्यायला विसरू नका.
५. हिवाळ्यामध्ये फिरायला जाणं सुखद आहेत पण तेवढेच सुरक्षित करण्यासाठी अतिवेगात गाडी चालवणे टाळावं.
६. सामान्यतः हिवाळ्यात धुकं हे पडतच , तुम्ही अगदी शहरात किंवा एखाद्या गावात जरी राहत असाल तरी रस्त्याने कार किंवा दुचाकी चालवत असताना देखील वाहनाचे लाईट चालू ठेवा. सिग्नल पाळणे, चुकीच्या दिशेने ओव्हरटेक न करणे हे बेसिक नियम पाळाच, म्हणजे अपघात होण्याची शक्यता कमी राहील.