कराची : बातमी आहे पाकिस्तानच्या Pakistan कराचीमधून Karachi आणि तीही कुविख्यात डॉन दाऊद इब्राहिम Don Dawood Ibrahim बाबत… दाऊद इब्राहिमला विषबाधा झाली असून सुरक्षेच्या कारणाने त्याच्यावर सध्या राहत्या घरीच डॉक्टरची टीम उपचार करत असल्याची माहिती रविवारी रात्री वाऱ्यासारखी पसरली आहे. तर काही मीडिया रिपोर्ट नुसार त्याच्यावर कराचीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकीकडे असं समजत आहे की दाऊदवर उपचार सुरू आहेत, त्याला खूप ताप असून उलट्या देखील होत आहेत. कोणी सांगताय की त्याच्यावर विष प्रयोग करण्यात आला आहे. तर मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दाऊदला फूड पॉइझनिंग झालं आहे असं समजतं आहे. आता एकीकडे या सर्व बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे अद्यापही समजू शकलो नाहीये. पण दुसरीकडे असेही समजत आहे की येत्या 27 डिसेंबरला दाऊदचा वाढदिवस आहे आणि यासाठी कराचीमध्ये खास मेजवानीचे देखील आयोजन करण्यात आलं असून यासाठी विशेष पाहुण्यांना देखील आमंत्रित करण्यात आल आहे. आता तपास यंत्रणांना अशा उलट सुलट बातम्या मिळत आहेत. या सर्व बातम्यांवर काही वेळात शिक्कामोर्तब होऊ शकतो असं देखील म्हटलं जातंय, परंतु खरंच दाऊदला विषबाधा झाली आहे का ? हे स्पष्टपणे अद्याप समजू शकलेलं नाही.
पाकिस्तानमध्ये इंटरनेट कनेक्शन ठप्प
दरम्यान पाकिस्तानमध्ये संशयास्पद हालचाली देखील एकीकडे सुरू आहेत. पाकिस्तानमधील प्रसिद्ध वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची पाकिस्तानमध्ये एक वर्चुअल रॅली आयोजित करण्यात आली होती. यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी मुद्दामहून हे इंटरनेट कनेक्शन ठप्प करण्यात आलं होतं.
परंतु याचं वास्तव काहीतरी वेगळेच असून दाऊद बाबातरच्या बातम्या बाहेर जाऊ नये यासाठी हे इंटरनेट कनेक्शन ठप्प करण्यात आलं असावं असं देखील बोलले जात आहे.
कोण आहे दाऊद इब्राहिम ?
कुविख्यात गँगस्टर दाऊद याचे जन्मनाव शेख दाऊद इब्राहिम कासकर असे आहे. त्याचा जन्म २७ डिसेंबर, इ.स. १९५५ ला रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी झाला होता. मुंबईतील 4 डी-कंपनी नामक संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख असलेला कोंकणी मराठी-भारतीय गुन्हेगार असून संघटित गुन्हेगारी व बनावटगिरीच्या प्रकरणांसाठी इ.स. १९९३ सालापासून इंटरपोल त्याच्या शोधात आहे. याचे वास्तव्य आज अनेक वर्षांपासून कराचीत आहे. आजही मुंबईत त्याच्या मालकीच्या काही इमारती आहेत,त्याचबरोबर अनेक नातेवाईक देखील असलयाचे समजते. मुंबईतील 93 च्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दौड इब्राहिमचा होता.
संदर्भ : गूगल