पुणे : पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून Pune Anti-Corruption Bureau एक मोठी बातमी समोर येते आहे . बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी तीन शिक्षणाधिकाऱ्यांन विरोधात गुन्हा दाखल Case filed करण्यात आला आहे. यामध्ये माजी शिक्षणाधिकारी किरण लोहार Kiran Lohar, तुकाराम सुपे Tukaram Supe आणि विष्णू कांबळे Vishnu Kamble यांच्या विरोधात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे लाचलुचपत विभागाने या तीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात त्यासह ही संपत्ती मिळवण्यासाठी सहकार्य केल्याप्रकरणी कुटुंबीयांमधील व्यक्तींन विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विष्णू कांबळे
सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सांगलीच्या विश्रामबाग पोलीस स्थानकामध्ये विष्णू कांबळे यांच्या विरुद्ध ८२ लाखाची बेहिशोबी संपत्ती जमा केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये विष्णू कांबळे आणि त्याची पत्नीच्या नावे तब्बल ८२ लाख ९९ हजार ९५२ रुपयांची बेहिशोबी संपत्ती असल्याचं उघडकीस आले आहे. 16 जून 1986 ते 6 मे 2022 या कालावधीत शिक्षणाधिकारी पदावर असताना विष्णू कांबळे यास लाच घेताना अटक करण्यात आली होती.
किरण लोहार
किरण लोहार यांने सोलापूर जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी पदावर असताना पाच कोटी 85 लाख 85 हजार 623 रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. तपासामध्ये लोहार याची पत्नी सुजाता लोहार आणि मुलगा निखिल लोहार यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुकाराम सुपे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माजी आयुक्त पदावर असताना ३ कोटी 59 लाख रुपयांची बेहिशोबी संपत्ती जमवल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. सध्या सेवानिवृत्त असलेला तुपे यास अटक देखील करण्यात आली होती.