MAHARASHTRA POLITICS : आगामी लोकसभा निवडणुकांच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता Code of conduct लागू शकते. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांनी एक मोठी घोषणा केली आहे. बारामती, शिरूर, सातारा, रायगड या ४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचे अजित पवार यांनी घोषित केले आहे.
हे वाचलेत का ? Winter Session : हिवाळी अधिवेशनात ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम’ करता येणार नाही घोषणाबाजी ! सचिवालयाकडून खासदारांना मार्गदर्शक तत्त्वे जारी
यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले कि, लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून आणायचे आहेत. बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागा आपण निवडणार आहोत. इतर जागांसंदर्भात आपण शिंदे, फडणवीसांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू. जागावाटपासंदर्भात या सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. आपल्या कार्यकर्त्याची ताकद पाहून आपण त्यांची निवड करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, महायुतीत लोकसभेच्या चार जागा बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणा आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा आहेत. बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत. त्याचबरोबर इतर जागांसंदर्भात आपण शिंदे, फडणवीसांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू असे देखील अजित पवार यांनी म्हंटले आहे.