बेंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी PM NARENDRA MODI यांनी कर्नाटकातील बेंगळुरूयेथे तेजस विमानाने प्रवास केला. शनिवारी त्यांनी बेंगळुरू येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड Aeronautics Limited (HL) केंद्राला भेट दिली.
या उड्डाणाचा अनुभव शेअर करत पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. आज तेजसमध्ये उड्डाण करताना मी अत्यंत अभिमानाने सांगू शकतो की, आपल्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे आपण स्वावलंबनाच्या क्षेत्रात जगात कोणाच्याही मागे नाही.
यावेळी पीएम मोदींनी को-पायलटची भूमिका बजावली. तेजस हे मेड इन इंडिया विमान आहे. बंगळुरूयेथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी तेजसच्या उत्पादन सुविधा आणि इतर सुविधांचा आढावा घेतला आणि उपस्थित लोकांशी संवाद साधला.