मुंबई : अभिनेत्री भूमी पेडणेकर हिला डेंग्यूची लागण झाली आहे. प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करून माहिती दिले तसेच सर्वाना सुरक्षित राहण्याचे देखील आवाहन केले आहे.
अभिनेत्री भूमी पेडणेकर पेडणेकर हिची प्रकृती खालावली आहे. डेंग्यूमुळे प्रकृती खालावल्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्रीचा रुग्णालयातील फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भूमी पेडणेकर हिने स्वतः रुग्णालयातील एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री डेंग्यू झाल्याची माहिती दिली आहे.
https://www.instagram.com/p/Cz8CT04oQQY/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर सध्या भूमी पेडणेकर हिची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चाहत्यांना सावध आणि स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या सर्वत्र फत्क आणि फक्त भूमी हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.
रुग्णालयातून फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘एका डेंग्यू मच्छरने मला आठ दिवस प्रचंड त्रास दिला आहे. पण आज मी उठली आणि मला चांगलं वाटलं.. म्हणून एक सेल्फीतर काढायलाच हवी…’ अस लिहिलं आहे.‘मित्रांनो, सावध राहा, कारण गेले काही दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. अशा वेळी तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवा आणि डासांपासून बचाव करणं फार महत्त्वाचं आहे. प्रदुषणामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती प्रभावित झाली आहे. माझ्या ओळखीतल्या अनेकांना डेंग्यू झाला आहे. अदृश्य विषाणूने माझी प्रकृती खालावली आहे.’
एवढंच नाही तर, अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉक्टर, नर्स, कुटुंबाचे देखील आभार मानले आहेत. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. शिवाय भूमी हिची प्रकृती सुधारावी म्हणून प्रार्थना देखील करत आहेत.