पुणे : पुण्यामध्ये सायबर गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात घडते आहे. सायबर गुन्हेगार दरवेळी नवनवीन युक्त्या लढवून नागरिकांना लाखोंचा गंडा घालत आहेत. मोठ्या प्रमाणावर जनजागृती करूनही नागरिक किरकोळ अमिषांना फसून स्वतःचे नुकसान करून घेत आहेत. पुण्यातील एका तरुणाला देखील असाच लाखोंचा फटका बसला आहे.
नेमकं काय घडलं
पुण्यातील सुलभ नांगर नावाच्या युवकाला या आरोपींनी मोबाईलवर थेट संपर्क साधला आणि युट्युबला सबस्क्राईब आणि लाईक करण्यासाठी आकर्षक कमिशन मिळेल असं आश्वासन दिलं. त्यांच्या या भूलथापांना सुलभ बळी पडला आरोपींनी जसे सांगितले त्या पद्धतीने सुलभणे सुरुवातीला काम देखील केले. त्यातून त्याला 1350 रुपये कमिशन देखील दिले गेले.
त्यानंतर टेलिग्राम अँपवर लिंक पाठवून कमिशन से अमिष दाखवून सुलभ यांना व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बाहण्याने 49 लाख 68 हजार रुपये यांना गंडा घातला आहे. त्यानंतर या चोरट्यांनी कोणताही संपर्क केला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याच सुलभ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनला धाव घेतली. गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सुरू आहे.










