हल्द्वानी : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा अपघात झाला आहे. मंगळवारी रात्री उशिरा हल्द्वानीहून काशीपूरला जात असताना बाजपूर येथे त्यांची कार दुभाजकावर आदळली. या अपघातात माजी मुख्यमंत्र्यांच्या कंबरेला आणि मानेला दुखापत झाली आहे. तर एका सहकाऱ्याच्या हाताला तर दुसऱ्याच्या पायाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर लगेचच माजी मुख्यमंत्र्यांसह अन्य दोन जखमीही काशीपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.
माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी सकाळी फेसबुकवर या अपघाताबाबत पोस्ट करत चिंता करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. ते आणि त्यांचे सहकारी ठीक आहेत.
माजी सीएम हरीश रावत हे मंगळवारी हल्द्वानी येथे पोहोचले. त्यानंतर ते सायंकाळी उशिरा काशीपूरला जात होते. बाजपूरमध्ये त्यांची कार दुभाजकावर आदळली. या गाडीत माजी मुख्यमंत्र्यांशिवाय सहयोगी अजय शर्मा आणि कमल रावत देखील होते.या अपघातात माजी मुख्यमंत्र्यांच्या मानेला आणि कंबरेला किरकोळ दुखापत झाली आहे. तर अजय यांच्या हाताला आणि कमलच्या पायाला दुखापत झाली.