पुणे : महाराष्ट्राच राजकीय Maharashtra Politics वातावरण हे सातत्याने खराब होते आहे. पक्षातील दिग्गज आणि निष्ठावंत नेत्यांच्या षडयंत्रांमुळे मोठमोठे पक्ष फुटले आणि त्यातून आता अनेकांना पश्चाताप देखील होतो आहे. सध्या मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal हे हाती मशाल घेणार की घर वापसी करणाराच्या चर्चेला उधाण आले आहे.
लोकसभा आणि राज्यसभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी नाकारल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर प्रचंड नाराज आहेत हे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसून येते आहे. लोकसभेमध्ये तिकीट नाकारल्यानंतर सातत्याने महायुतीच्या विरोधात केली जाणारी वक्तव्य देखील त्यांच्या नाराजीचे स्पष्ट संकेत देत असतानाच मी दादांसोबत नाही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे या वक्तव्याने आता नवीन चर्चेला उधाण आले आहेत.
मंत्री छगन भुजबळ हे शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार अशा चर्चेला उधाण आले होते. परंतु यावर संजय राऊत यांनी आमचा त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. असे स्पष्टीकरण दिले तर आता छगन भुजबळ हे घर वापसी करणार का ? अशा चर्चेला ऊत आला आहे. मात्र यावर शरद पवार यांनी देखील आम्हाला काही माहीत नाही असे स्पष्ट उत्तर दिले. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे येणारा काळात स्पष्ट करेल.