Mukesh Khanna : लोकसभा निवडणुकीचा निकाल जसा लागला तसं यंदाच्या पंचवार्षिकमध्ये भाजपला अनेक विषयांवर विचार मंथन करावे लागणार आहे यात शंका नाही. देशांमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती आयोध्यामध्ये भाजपच्या झालेल्या पराभवाची..
भाजपने 22 जानेवारी रोजी आयोध्येतील राम मंदिरात भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला होता. राम लल्लांची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. निवडणुकीमध्ये हा देखील एक मुद्दा भाजपासाठी सकारात्मक असेल अस देशभरातून सामान्य आणि अगदी राजकीय व्यक्तिमत्व देखील स्पष्टपणे सांगत होते. पण वास्तवात मात्र काहीतरी वेगळंच पाहायला मिळते आहे. आयोध्येच्या जनतेने भाजपला डावलल असून समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांना निवडल आहे. यावरून आता देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना 90 च्या दशकातील लोकप्रिय शक्तिमान म्हणजेच मुकेश खन्ना यांनी एक परखड प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
https://www.instagram.com/p/C73KLAZo-ls/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेते मुकेश खन्ना Mukesh Khanna यांनी एक पोस्ट शेअर करून लिहिले आहे की, अयोध्या निवडणुकीतील पराभवातून आपण हे शिकायला हवं की भव्य मंदिरासोबतच आसपासच्या शहरवासीयांचं जीवनही भव्य बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोट्यवधींच्या बजेटमध्ये तिथल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काही कोटी रुपये बाजूला ठेवावेत, मग ते राम मंदिर असो, चार धाम असो किंवा जयपूरजवळचं खाटू शामचं मंदिर असो.. श्रद्धेच्या स्थळांना टूरिस्ट स्पॉट बनू देऊ नका. तिथे लोकसुद्धा राहतात, त्यांची काळजी घ्या’, असा त्यांनी लिहिले आहे.
अयोध्येतील भाजपला पचवाव्या लागणाऱ्या पराभवावर सुनील लहरी अर्थात रामायणातील लक्ष्मणाचे प्रसिद्ध पात्र साकारणारे अभिनेते यांनी देखील सोशल मीडियावर संताप व्यक्त केला त्यांनी लिहिले आहे की, ‘आम्ही हे विसरलो की हे तेच अयोध्यावासी आहेत, ज्यांनी वनवासातून आल्यानंतर सीता मातेवर शंका घेतली होती. जी व्यक्ती देव प्रकट झाल्यावर त्यांना नकार देत असले तर अशा व्यक्तीला काय म्हणतात? स्वार्थी! इतिहास साक्षीदार आहे की अयोध्येतील लोकांनी नेहमीच त्यांच्या खऱ्या राजासोबत विश्वासघात केला आहे. धिक्कार आहे!’ असे त्यांनी लिहिले आहे.