चंदीगड : मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या खासदार कंगना रणौतबाबत Kangana Ranaut मोठी बातमी समोर येत आहे. दिल्लीला जाताना चंदीगड विमानतळावर एका महिला CISF गार्ड कंगना राणावतला कानशिलात लगावली आहे. शेतकरी आंदोलनाविरोधात कंगना रणौतने केलेल्या वक्तव्यामुळे सीआयएसएफ गार्ड संतापली होती. त्यामुळेच तिने कंगनावर हल्ला केला.
नेमकं काय घडल
आज कंगना भाजपच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी एमपी यूके 707 विमानाने दिल्लीला जात होती. यावेळी सुरक्षा तपासणी करून ती बोर्डिंगसाठी गेली असता सीआयएसएफच्या महिला जवानाशी तिचा वाद झाला. ज्यानंतर गार्डने तिला कानशिलात लगावली आहे. या संदर्भात पुढील तपासासाठी सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आज दिल्लीला रवाना झाली होती. तिने तिच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीज सेक्शनमध्ये एक फोटो देखील शेअर केला आहे. मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या कंगनाने विक्रमादित्य सिंह यांचा 74755 मतांनी पराभव केला. कंगनाला एकूण 5,37,022 मते मिळाली. कंगनाने आपली पहिली निवडणूक जिंकली होती. यामुळे हिमाचलच्या इतर तीन जागांवर झेंडा फडकवण्यात भाजपला यश आले.